Agriculture News in Marathi Bodhegaon area for the third time Heavy rain | Page 3 ||| Agrowon

बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा  अतिवृष्टीचा जोरदार तडाखा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी ( ता.२५) रात्री एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे.

नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी ( ता.२५) रात्री एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेवगाव-गेवराई मार्गावरील काळा ओढ्यावरचा पूल पुरामुळे उखडल्याने वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे ठप्प झाली होती. 

शेवगाव तालुक्यात अलीकडच्या काळात सातत्याने पावसाचा तडाखा बसत आहे. बोधेगावसह बालमटाकळी, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, आधोडी, आंतरवाली, दिवटे, हातगाव, कांबी, मुंगी व इतर गावांना या पूर्वी ३० ऑगस्ट, ४ सप्टेंबर असा दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. काल रात्री तिसऱ्यांदा पुन्हा शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाची बोधेगाव व चापडगाव अतिवृष्टीची नोंद झाली. एकाच महिन्यांत तीनदा अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, कांदा, ऊस आदी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानींचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. बोधेगाव मंडलात लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांसह राहती घरे, जनावरे, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानींचे सरसकट पंचनामे पूर्ण करून तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांनी केली आहे. 


इतर बातम्या
विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा : अजित...मुंबई ः सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व...
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याला...सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी...
 मोबाइल रसवंती ठरली शेतीला आधार आर्णी, जि. यवतमाळ ः रोजगार आणि नोकरीच्या शोधात...
परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे...
  कृषी विभागाकडून आतापर्यंत  सात...पुणेः कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने...
मराठवाड्यात ६८५ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ८७...
बिळाशी परिसरातील ऊस लागला वाळूबिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या...
द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या...नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात...
रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये...अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त...
पुणे विभागात रब्बीच्या पेरण्यांना येईना...पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत...
‘आत्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांना...नगर ः कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसह ‘...
अनियमित वीजपुरवठ्याने नांदेड जिल्ह्यात...नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा...
खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच  जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी...पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर...
जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी  देवकर,...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी...
केव्हीकेतर्फे कीडनियंत्रण सापळ्यांचे...वाशीम : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे जसे...
कृषिपंपांसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलनभंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या...
नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा...नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन...
देवीखिंडीच्या शेतकऱ्यांना ‘टेंभू’च्या...लेंगरे, जि. सांगली : टेंभूच्या चौथ्या, पाचव्या...