टोळधाड आक्रमणाचे गंभीर आव्हान

टोळ
टोळ

नवी दिल्ली: राजस्थान आणि गुजरातमधील पाकिस्तानच्या सीमेशेजारील भागात टोळधाडीचे आक्रमण गंभीर झाले आहे. या प्रादुर्भावग्रस्त भागात सरकारने २५ जुलैपर्यंत तब्बल ३० हजार ४२३ हेक्टरवर प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. सरकारने विविध उपायांचा उंतर्भाव करून मिशन मोडवर योजना रबविली तरीही टोळधाडीचे आव्हान गंभीर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  पाकिस्तानमध्ये टोळधाडीने धुडगूस घातल्यानंतर सीमेशेजारील राजस्थान आणि गुजरात राज्यांमध्ये जून महिन्यातच शिरकाव केला होता. मात्र, जूनमध्ये पावसाअभावी या भागात पेरण्या झाल्या नव्हत्या त्यामुळे पिकांचे नुकसान झाले नव्हते. मात्र आता खरीप पेरण्यांनी वेग घेतल्यानंतर टोळधाडीचा धोका वाढला आहे. त्यामुळे टोळ नियंत्रणासाठी सरकारने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. टोळांनी धुडगूस घातलेल्या क्षेत्रापैकी २५ जुलैपर्यंत तब्बल ३० हजार ४२३ हेक्टरवर उपायोजना केल्या आहेत.  ज्या शेतकऱ्यांच्या पिकांवर टोळधाडीचे आक्रमण झाले आहे,  असे शेतकरी अस्वस्थ झाले असून, त्यांनी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जून महिन्यात केवळ ५ हजार हेक्टरवर टोळचा प्रादुर्भाव झाला होता. आता प्रादुर्भाव सहा पटीने वाढला असून, स्थिती गंभीर झाली आहे. या भागातील खरीप पिकेही धोक्यात आली असून, टोळ नियंत्रक पथक हे शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला मार्गदर्शन करत आहे.  प्रजननासाठी अनुकूल स्थिती टोळ हे पाकिस्तानमार्गे वाऱ्याच्या दिशेने भारतात येतात. सध्या प्रौढ नाकतोड्यांचा प्रादर्भाव हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात आढळला आहे. सध्या या भागात नाकतोड्यांना प्रजननासाठी अनुकूल स्थिती आहे. नाकतोडे किंवा टोळ हे अंडी घालण्यासाठी दमट वातावरणाकडे आगेकूच करतात. दमट वातावरणाची स्थिती ही नाकतोड्यांना प्रजनन करण्यासाठी अनुकूल असल्याने या भागात येणाऱ्या काळात टोळेचे आक्रमण गंभीर होणार आहे.     जैसलमेर जिल्ह्यात सर्वाधिक फटका राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात २० हजार ७७० हजार हेक्टरवर टोळचा धोका आहे. तर बानमेरमध्ये ३ हजार ८६८ हेक्टर, जालोरमध्ये ४८० हेक्टर, जोधपूर जिल्ह्यात ७४१ हेक्टर, बिकानेर जिल्ह्यात ३ हजार ५११ हेक्टर, श्री गंगानगर जिल्ह्यात ६५ हेक्टर आणि चुरू जिल्ह्यात १९० हेक्टरवर उपाययोजना केल्या आहेत. गुजरातमधील भूज आणि बनासकांता जिल्ह्यातही टोळ नियंत्रणाचे काम सरकार करत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com