‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी लाटला लाखोंचा निधी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम-किसान) लाभ घेणाऱ्या ५६ हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील तब्बल एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
PM_kisan
PM_kisan

मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम-किसान) लाभ घेणाऱ्या ५६ हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील तब्बल एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. तब्बल ९५ लाख ३८ हजारांची वसुली करावयाची आहे. पहिल्याच दिवशी १६ हजार रुपयांची वसुली झाल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.  योजनेच्या पोर्टलवरुन ही माहिती प्राप्त झाली. बोगस लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. या लाभार्थ्यांनी रक्कम न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर रक्कमेचा बोजा लावण्यात येईल. गाव नमूना नं.६, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल, असे श्री. राजपूत यांनी सांगितले. तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसिलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तालुक्यात ५६ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरून एक हजार १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com