‘बनावट कीटकनाशकप्रकरणी कारवाई सुरू’

‘बनावट कीटकनाशकप्रकरणी कारवाई सुरू’
‘बनावट कीटकनाशकप्रकरणी कारवाई सुरू’

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशके व साहित्य बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत दिली. या संबंधीची लक्षवेधी सूचना आमदार वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्या वेळी श्री. खोत बोलत होते. श्री. खोत म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आढळून आलेल्या गंभीर उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने त्यांचा बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्रीचा परवाना ५ नोव्हेंबर २०१८ पासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी रद्द केलेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर १ व तालुका स्तरावर १६ अशा एकूण १७ भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशके विक्री केंद्रे तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने ८६ प्रकरणांत विक्री बंद आदेश देण्यात आलेले असून, १७ कृषी सेवा विक्री केंद्राचे परवाने रद्द/निलंबित करण्यात आलेले आहेत. तसेच गुण नियंत्रक निरीक्षकांमार्फत व भरारी पथकामार्फत यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, कळंब, पांढरकवडा आणि नेर या तालुक्यांमध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करून व धाडी टाकून कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com