agriculture news in Marathi, boll worm attack on cotton in Nagpur district, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नागपूर जिल्ह्यातही आढळली गुलाबी बोंड अळी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे अद्याप बाकी असतानाच यावर्षी पुन्हा बोंड अळीने हंगामाच्या सुरवातीलाच डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काटोल तालुक्‍यातील धोतीवाडा येथील नूर महंमद युनूस मुसानी यांच्या शेतातील कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
 

नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे अद्याप बाकी असतानाच यावर्षी पुन्हा बोंड अळीने हंगामाच्या सुरवातीलाच डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काटोल तालुक्‍यातील धोतीवाडा येथील नूर महंमद युनूस मुसानी यांच्या शेतातील कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
 

ही माहिती मिळताच केंद्रीय एकीकृत जीवप्रबंधक व केंद्रीय कृषी विभागाचे तज्ज्ञ डॉ. आशीष जयस्वाल यांच्यासह काटोल उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.एस. निमजे, काटोल तालुका कृषी अधिकारी एस. डब्ल्यू. कन्नाके, कृषी सहाय्यक आर. टी. बालपांडे, मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र बांबल, कृषी सहाय्यक जे. एम. जायभाये, नितीन निघूट, प्रभाकर कुंबरे, महेंद्र सोमकुवर यांनी शेताला भेट देत पाहणी केली. कपाशीच्या फुलावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे या वेळी दिसून आले. कृषी विभागाने त्यानंतर फेरोमोन ट्रॅप्स लावले.

त्यासोबतच निंबोळी अर्काच्या फवारणीची सुचना करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येईल, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. 

प्रायोगिक तत्त्वावर होणार सर्वेक्षण
धोतीवाडा येथे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. क्रॉपसॅप अंतर्गंत काटोल तालुक्‍यातील ८४ प्लॉट ठरवून प्रायोगीक तत्त्वावर सर्व्हेक्षण व नियंत्रणाची माहिती दिली जाणार असल्याच माहिती या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एस. निमजे यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...