agriculture news in marathi, bollwarm compensation issue,akola, maharashtra | Agrowon

बोंड अळी नुकसानीच्या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये रोष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
अकोला : या हंगामात बोंड अळीने संपूर्ण कापूस पीक उद्‍ध्वस्त केले असल्याने शासनाने मदतीची घोषणासुद्धा केली. मात्र ही मदत देताना पंतप्रधान पीकविमा याेजनेसाठी लावल्या जाणारा ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा निकष बाेंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतानाही लावल्याने हजारो शेतकरी वंचित राहत आहेत. यामुळे ठिकठिकाणी वंचित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाकडे निवेदने दिली जात अाहेत. नुकसान झाल्याने भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत अाहेत.  
 
अकोला : या हंगामात बोंड अळीने संपूर्ण कापूस पीक उद्‍ध्वस्त केले असल्याने शासनाने मदतीची घोषणासुद्धा केली. मात्र ही मदत देताना पंतप्रधान पीकविमा याेजनेसाठी लावल्या जाणारा ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा निकष बाेंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतानाही लावल्याने हजारो शेतकरी वंचित राहत आहेत. यामुळे ठिकठिकाणी वंचित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाकडे निवेदने दिली जात अाहेत. नुकसान झाल्याने भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत अाहेत.  
 
कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले होते. परंतु सर्वाधिक पेरणी असलेली मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, कुरूम, शेलूबाजार, निंभा ही महसूल मंडळे भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष अाहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांची भेट घेत शासनाकडे निवेदन पाठवले. तातडीने ठोस पावले न उचलल्यास १० दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला अाहे.
 
आॅक्टाेबर, नोव्हेंबर महिन्यांत ज्या शेतकऱ्यांनी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांनी पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, तालुकास्तरीय समितीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पालकमंत्री रणजित पाटील यांनी जांभा खुर्द व शेलुबोंडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर, तर खासदार संजय धोत्रे यांनी पुंडलिक नगर येथील विवेक पातोंड यांच्या शेतात पाहणी केली.
 
त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समितीने बोंड अळी नुकसीनीची पाहणी केली. मात्र नंतर चुकीचा अहवाल देण्यात अाला. याबाबत प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, प्रा. गौरखेडे, हरनामसिंह बाजहिरे, सुनील काळे, अरुण बोंडे यांच्यासह इतरांनी याबाबत निवेदन दिले.  
 
गुलाबी बोंड अळीच्या मुद्द्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात कमालीची घट झाली.

याबाबत तलाठी व कृषी सहायकांमार्फत सर्वेक्षण करून घेतले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून मदत जाहीर केली. परंतु, ३३ टक्‍क्‍यांच्या वर नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा फायदा होणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत. राज्य सरकारने सर्वच शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले.

जिल्ह्यात ५१ महसूल मंडळांपैकी केवळ १८ मंडळेच बाेंड अळीमुळे झालेल्या नुकसानासाठी पात्र ठरविण्यात अाली आहेत. ३७ हजार २६३ शेतकरी हे बाेंड अळी नुकसानासाठी पात्र; तर ६३ हजार ६२३ शेतकरी नुकसानभरपाईसाठी अपात्र ठरले आहेत. पात्रपेक्षा अपात्र ठरलेल्यांची संख्या अधिक अाहे.

इतर ताज्या घडामोडी
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...