पोखरापूरच्या पाण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन

पोखरापूरच्या पाण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन
पोखरापूरच्या पाण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लागली आहे. परंतु त्यामधून पोखरापूर तलावात पाणी सोडले जात नाही, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे सोलापुरात सिंचन भवनसमोर सोमवारी (ता. ११) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. 

संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देशमुख म्हणाले, ''शासनाने पाणी सोडण्यासाठी कायदेशीर तरतूद केली असूनही योजना रखडली आहे. पाणी सोडण्यासाठी तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत. त्वरित पाइपलाइनद्वारे पोखरापूर तलावात पाणी सोडावे.''

आष्टी सिंचन योजनेचे पाण्याचा हिवरे, वडाची वाडी, चिखली, यावली या गावांना लाभ होणार आहे. सीना -माढा सिंचन योजनेचे काम वाफळे गावाच्या शिवेवर आले आहे. देवडी या गावाच्या दोन्ही बाजूंनी २ किलोमीटरच्या अंतरावरून पाणी कॅनॉलद्वारे जात आहे. त्यामुळे वाफळे, देवडी, खंडोबाचीवाडी, कोंबडवाडी, नालबंदवाडी या गावांचा सर्व्हे करून सीना माढा किंवा आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली.

शासनाला या गावांना पाणी देण्यासाठी कमी खर्च येणार आहे. ही योजना परवडण्यासारखी आहे. कायदेशीर तरतूद असताना सरकारच्या दुर्लक्षामुळे ही योजना रखडली आहे. परंतु, आता सारोळे, खवणी व पोखरापूर या भागांतील शेतकऱ्यांचा योजनेवरचा विश्वास उडत चालला आहे, असे देशमुख म्हणाले.

या आंदोलनात प्रसंगी संजय तळेकर, धनाजी थोरात, काका पाटेकर, बापू गवळी, श्रीमंत घाटे, दत्तात्रय डोंगरे, अनिल पाटील, चंद्रकांत मेंढे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com