नांदेड जिल्ह्यात बोंड अळीने नुकसान पातळी ओलांडली

नांदेड जिल्ह्यात बोंड अळीने नुकसान पातळी ओलांडली
नांदेड जिल्ह्यात बोंड अळीने नुकसान पातळी ओलांडली

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. तळणी (ता. नांदेड) येथील एका शेतकऱ्याच्या शेतावरील कपाशीमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असल्याचे कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या सर्वेक्षण पथकास शुक्रवारी (ता. २७) आढळून आले.

बोंड अळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कृषी विभाग आणि पोखर्णी (ता. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना बोंड अळीच्या व्यवस्थापनाची माहिती दिली जात आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विशेषज्ञ प्रा. माणिक कल्याणकर, कृषी विद्यावेत्ता प्रा. संदीप जायभाये, कृषी पर्वेक्षक एस. एम. करंजकर, कृषी सहायक मनोहर वडवळे यांच्या पथकांने शुक्रवारी (ता. २७) तळणी (ता. नांदेड) येथील शेतकरी वैजनाथराव सूर्यवंशी यांच्या शेतावर लागवड केलेल्या एक एकर कपाशीचे रॅन्डम सर्वेक्षण केले असता २० पैकी १६ फुलांमध्ये बोंड अळी अळी आढळून आली. किनवट, हदगाव तालुक्यातील सर्वेक्षणानंतर शनिवारी (ता. २८) या पथकाने माहूर तालुक्यातील कपाशीचे सर्वेक्षण केले.

अनेक ठिकाणी बोंड अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे. बोंड अळीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी शिफारशीप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे प्रा. कल्याणकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com