बोंड अळीच्या अनुदानाबाबत प्रतीक्षा कायम

बोंड अळीच्या अनुदानाबाबत प्रतीक्षा कायम
बोंड अळीच्या अनुदानाबाबत प्रतीक्षा कायम

जळगाव ः कापूस पिकावर मागील हंगामात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या अनुदानाबाबत तक्रारी अजूनही कायम आहेत. खानदेशात १० ते १२ हजार शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक व अन्य अधिकारांबाबतचे घोळ तलाठी दूर करायला तयार नसल्याचा दावाही शेतकरी करीत आहेत. 

गुलाबी बोंड अळीग्रस्त कापूस पिकात मोठे नुकसान झाले. यावर शासनाने खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५० कोटींचे अनुदान जाहीर केले. धुळे तालुक्‍यास ३७ कोटी, शिंदखेडा, साक्री व शिरपूर तालुक्‍यांनाही प्रत्येकी सुमारे ३० कोटींवर अनुदान मंजूर झाले. कापूस हे प्रमुख पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बागायतदार शेतकऱ्यांना हेक्‍टरी १३ हजार व कोरडवाहूसाठी हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये अनुदान जाहीर होते. 

कमाल शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण झाले, परंतु अनेक शेतकरी तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या तांत्रिक चुकांमुळे अनुदानापासून वंचित आहेत. बॅंक खाते क्रमांक चुकले आहेत, तर काही ठिकाणी सातबारा उताऱ्यावरील नावांचा घोळ आहे.  अनुदान वाटपाची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावायची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु या मागणीची दखल घेतलेली नाही. 

जळगाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचे अनुदान यावल तालुक्‍यातील एका बाजारपेठेच्या मोठ्या गावातील राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खात्यात चुकीने जमा झाले. ते मिळविण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला तलाठी व संबंधित बॅंकेकडे चकरा माराव्या लागल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com