agriculture news in Marathi books of 12th std now online Maharashtra | Agrowon

बारावीची पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

बालभारतीच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा बारावीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे सर्व विषयाची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालभारतीच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही.

या कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याचबरोबर रेडीओ, टीव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे. ऑनलाइन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी, हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. 

ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची यादी : युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत),पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी) , महाराष्ट्री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी(इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दू (उर्दू), युवकभारती – सिंधीन (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती - तेलुगू (तेलुगू) शिक्षणशास्र(मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दू), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दू), तर्कशास्र (इंग्रजी) बालविकास(इंग्रजी), भौतिकशास्र(इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 1)(इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी) , वाणिज्य संघटन व व्यवस्थापन(मराठी, इंग्रजी) ,चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी,इंग्रजी),अर्थशास्र (मराठी,इंग्रजी) ,जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी , इंग्रजी) ,इतिहास (मराठी),राज्यशास्र (मराठी , इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी). 

विद्यार्थ्यांना दिलासा 

  • शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून निर्णय 
  • बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध 
  • घरबसल्या अभ्यास करता येणार 
  • मोबाईलवर पुस्तके डाऊनलोड करता येणार 
     

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...