बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक

बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक

नाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी प्रकाश दौलत देवरे यांच्या गट नं.१५६ क्षेत्र ९० गुंठे उसाचे क्षेत्र शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी सप्टेबर १८ मध्ये उसाची लागवड केली हाती. मात्र, चालू वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असताना पाण्याचे व्यपस्थापन करून ऊस जगविला होता. विहिरीला कमी पाणी असताना ठिबक संच बसविला होता. यासाठी १ लाख १८ हजार रुपये खर्च करून ऊस जगवला होता.  अलीकडील काळात ऊस बेण्यासाठी सौदा झालेला होता. परंतु, शेजारील शेतकरी सुभाष राघो जाधव व राजेंद्र ताराचंद जाधव यांच्या विहिरीचे विद्युत जोडणीच्या केबल जळून उसात पडल्यामुळे ऊस जळून गेला. ही दुर्घटना घडल्याने ३ लाख रुपयांचे ऊस बेणे व १ लाख १८ हजार रुपयांचा ठिबक सिंचन संच जळून गेला. यामुळे प्रकाश देवरे यांचे ४ लाख १८ हजारांचे नुकसान झाले. नुकसान झालेचा घटनास्थळी तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचासमक्ष केला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com