पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना रुग्णांसाठी देणार

सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचारासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत आणि व्हिडिओकॅान या दोन भक्त निवासांमधील २०० बेडच्या खोल्या कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Both the devotees reside in Pandharpur Corona will give for patients
Both the devotees reside in Pandharpur Corona will give for patients

सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचारासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत आणि व्हिडिओकॅान या दोन भक्त निवासांमधील २०० बेडच्या खोल्या कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरसह परिसरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंताजनक स्थिती आहे. सध्या सुमारे १ हजाराहून अधिक रुग्णांवर शहरातील दोन शासकीय व आठ खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षभरापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे. तरीही मंदिर समितीने कोरोना काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. 

जिल्हाधिकारी पाहणी करणार

दिवसेंदिवस वाढत्या कोरोनामुळे रुग्णांना रुग्णालयांत खाटा आणि उपचार मिळणे अवघड झाले आहे. अशातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

मंदिर समितीच्या या निर्णयानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दोन्ही भक्तनिवासांची लवकरच पाहणी करून आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहेत, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com