डीएड पदविका घेऊन शेतीत रमल्या दोघी जावा

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील संध्‍या विलास गवळी व पल्लवी संदीप गवळी या शिक्षणशास्त्र पदविका (डीएड) घेऊन शेतीच्या शाळेत रमलेल्या दोन जावांकडे पाहिल्यावर येते.
Both of them played in agriculture with DED diploma
Both of them played in agriculture with DED diploma

औरंगाबाद : घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समजदारीने केला की कुटुंबाची आर्थिक, सामाजिक घडी बसविण्यात मदत होते. याचीच परिचिती गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील संध्‍या विलास गवळी व पल्लवी संदीप गवळी या शिक्षणशास्त्र पदविका (डीएड) घेऊन शेतीच्या शाळेत रमलेल्या दोन जावांकडे पाहिल्यावर येते.

माळीवाडगावच्या संध्या विलास गवळी यांचे शिक्षण एमए डीएडपर्यंतच, तर त्यांचे पती विलासराव एमए बीएड झालेले. पल्लवी संदीप गवळी यांनी बारावीनंतर डीएड केले. तर त्यांचे पती संदीपरावही डीएड झालेले.

संध्या यांचा विवाह २०१३ मध्ये तर पल्लवी यांचा विवाह २०१५ मध्ये झाला. दोघींचेही माहेर औरंगाबाद शहरा लगतच चिकलठाणा. डीएडची पदविका व पदवी घेतल्यानंतर सहाजिकच नोकरीसाठी प्रयत्न दोन्ही दांपत्याकडून केले गेले. परंतु नोकरी न लागल्याने हातावर हात धरून न बसता घरच्या शेतीला दोन्ही दांपत्यांनी आपलेसे केले. दोन्ही भावांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास दोन्ही जावा पुढे झाल्या. विलास व संदीप या दोन्ही भावंडांना त्यांच्या पत्नी संध्या व पल्लवी यांनी साथ दिल्यानेच कुटुंबाकडील साडेअकरा एकर शेतीला आलापूर परिसरातील दहा एकर ठोक्याच्या शेतीसह पिंपळगाव परिसरातील तीन एकर बटईच्या शेतीची जोड देणे शक्य झाल्याचे ते सांगतात. एकूण जवळपास २५ एकर टॉमेटो, आले, मका, कपाशी, मोसंबी, खरबूज, टरबूज, फ्लावर, कारले आदी पीक ते घेतात.

प्रत्येक पिकाच्या व्यवस्थापनात दर दिवशी साधारणतः १० ते १२ मजूर गवळी कुटुंबाकडे कामाला असतात. या मजुरांकडून शेतीतील नियोजित काम वेळेत करून घेण्यासह प्रत्यक्ष महिला मजुरांसोबत लागवड, खुरपणी, खतावणी, मालाची तोडणी, ठिबक सिंचनाच्या नळ्या पांगवणे, यासह पिकाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संध्या व पल्लवी जबाबदारीने सांभाळतात. दोन जावांपैकी संध्या यांनी गावातील महिलांना गावात बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या गेलेल्या जलसंधारणासह इतर विकासात्मक कामाची माहिती पटवून देण्याचे काम केले.

संध्या यांच्या शेतीतील कामासोबतच सामाजिक कार्याची दखल घेऊन आरसीएफने नुकताच त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. येत्या काळात महिलांचा गट तयार करून शेतीसोबतच त्यांनाही आर्थिक सक्षमतेच्या बाबी पटवून देण्याचे काम आपण करणार असल्याचे संध्या विलास गवळी म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com