agriculture news in Marathi boycott on companies which provided adulterated seed Maharashtra | Page 2 ||| Agrowon

भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

गेल्या हंगामात भेसळयुक्‍त बियाण्याच्या सर्वाधीक तक्रारी झालेल्या दोन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भंडारा जिल्ह्यातील ॲग्रो डिलर असोसिएशनने घेतला आहे.

भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त बियाण्याच्या सर्वाधीक तक्रारी झालेल्या दोन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्ह्यातील ॲग्रो डिलर असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना रितसर पत्र देण्यात आले असून या दोन्ही कंपन्यांवर जिल्हा बंदीचा प्रस्ताव कृषी विभागाकडूनही आयुक्‍तालयाला पाठविण्यात आला आहे. त्यावर आयुक्‍तालयस्तरावरुन काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी एका कंपनीचे दोन तर अन्य एका कंपनीच्या एका धान वाणाची लागवड केली होती. परंतू यातील तीनही वाणांमध्ये भेसळ असल्याने काही शेतकऱ्यांकडे मुदतपूर्व तर काही शेतकऱ्यांकडे उशीरा धान निसवला. त्याचा उत्पादकतेवरही परिणाम झाल्याने याप्रकरणी एका कंपनीविरोधात ३७ तर दुसऱ्या कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी तब्बल ३५ तक्रारी केल्या.

तालुकास्तरीय समितीकडून त्याची दखल घेत शिवारभेटीत तपासणी करुन बियाणे भेसळयुक्‍त असल्याचा अहवाल देण्यात आला. आता या हंगामात या कंपन्यांचे बियाणेच विक्री न करण्याचा निर्णय ॲग्री डिलर असोसिएशनने घेतला आहे. 

एका कंपनीविरोधात ३७ तक्रारी आहेत. त्यामध्ये एका शेतकऱ्याने ग्राहकमंचात भरपाईची याचीका दाखल केली आहे. २१ शेतकऱ्यांसोबत कंपनीने तडजोड केली तर सात प्रकरणात भेसळ आढळली नाही. अन्य कंपनीच्या ३५ तक्रारी असून त्यामध्ये एकाही शेतकऱ्याने ग्राहकमंचात याचीका दाखल केलेली नाही. शेतकऱ्यांसोबत तडजोडीबाबत चर्चा सुरु असल्याचे कंपनीने कळविले आहे. मात्र या कंपन्यांचे बियाणे न विकण्याचा निर्णय ॲग्री डिलरकडून घेण्यात आल्याने बंदीचा प्रस्ताव आयुक्‍तालयाला पाठविला आहे. 
- प्रदीप म्हसकर, गुणनियंत्रण अधिकारी, भंडारा 


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात...नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे...
आपले सरकार सेवा केंद्रांची होणार तपासणी पुणे ः पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक...
कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला...नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि...
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य...रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह...
मुंबईसह कोकणात धुवांधार पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने...
देशात खरीप पेरणीला वेग नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर...
सव्वालाख हेक्टरवरून टोळधाडीचे उच्चाटन नवी दिल्ली: सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश,...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार...
तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे...
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...