The 'Brahmagavan' scheme was finally completed for eleven years
The 'Brahmagavan' scheme was finally completed for eleven years

‘ब्रम्हगव्हाण’ योजना अकरा वर्षांनतर अखेर पूर्ण

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या ब्रम्हगव्हान जलसिंचन योजनाचे काम एका वर्षात पोलिस बंदोबस्त घेऊन मार्गी लावण्यात आले. ५५ गावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. या योजनेमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शासनाचा पिण्याच्या टॅंकरवरचा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. - अनिल निंभोरे, कार्यकारी अभियंता ब्रम्हगव्हाण योजनेचे पाणी खेर्डा प्रकल्पाकडे येत असल्याने समाधानी आहे. मंत्री संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांना पाणी देण्याचा शब्द पाळला आहे. - बाबासाहेब शिंदे, प्रगतिशील शेतकरी

जायकवाडी, जि. औरंगाबाद  : पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजना अखेर अकरा वर्षानंतर पूर्ण झाली. या योजनेमुळे ५५ गावातील १४५८२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यासाठी योजनेंतर्गत भाग क्रमांक २ च्या कालव्यातून जायकवाडीतून खेर्डा प्रकल्पाच्या दिशेने बुधवारी (ता. १५) पाणी सोडण्यात आले. 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या सूचनाअन्वये, कार्यकारी संचालक एन.व्ही. शिंदे, मुख्य अभियंता अशोक आव्हाड, यांत्रिकी विभाग नांदेड चे अधिक्षक अभियंता महेंद्र सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, उपकार्यकारी अभियंता धनंजय गर्जे, मयुरा जोशी, श्रीपाद सुतार, नवनाथ पिसुटे, राहूल कातकडे, महेश देशमुख, अनुप बेंबरे, प्रशांत बावस्कर आदींनी पाणी खेर्डा प्रकल्पासाठी प्रवाहित‌ केले. 

खेर्डा प्रकल्पाची साठवण क्षमता ६.४८ दलघमी आहे. दुपारी बाराच्या दरम्यान ‘रोहयो’ मंत्री संदिपान भुमरे यांनीही पाणी सोडलेल्या डिलेव्हरी चेंबर कालव्याची पाहणी केली. नाथसागर जलाशयातून खेर्डा प्रकल्पात सोडलेले पाणी येत्या दोन दिवसांत पोहोचणार आहे. या प्रकल्पाचे पाणी नेण्यासाठी नाथसागरा पासून ते वडाळा वितरण कुंडपर्यंतचे अंतर ९ किलोमीटरपर्यंत आहे. ८५० अश्वशक्तीच्या पंपातून व १५०० मि.मि. व्यासाच्या पाइपलाइनव्दारे वितरण कुंडपर्यंत पाणी नेण्यात आले. तेथून ते पाणी कालव्यातून खेर्डा प्रकल्पापर्यंत सुरू आहे. 

ही योजना पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना अनेक अडचणी व संकटाचा सामना करावा लागला. त्यांनी खेर्डा प्रकल्पात पाणी आणणारच हा ५५ गावातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे पैठण तालुक्यात व खेर्डा परीसरातील शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com