‘ब्राह्मण समाजाचे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण व्हावे’

‘ब्राह्मण समाजाचे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण व्हावे’
‘ब्राह्मण समाजाचे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण व्हावे’

पुणे : राज्यातील साधारण ८० ते ९० लाख ब्राह्मण समाज संख्येपैकी ६० ते ७० लाख हे ‘क्रिमिलेअर’च्या खाली आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शनिवारी (ता. १) येथे केली. यासाठी लवकरच राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार असल्याचेही ब्राह्मण महासंघाकडून सांगण्यात आले आहे. मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण झाल्यानंतर थेट आरक्षण नाही, मात्र काही विशेष मागण्या आम्ही करू, त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दवे यांनी सांगितले.  दवे म्हणाले, ‘‘आजही ब्राह्मण समाजातील एक मोठा घटक मागासलेला आहे. पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील काही लोकांना वर्षातून केवळ १२० दिवसच काम असते, सरकारी नोकऱ्यांच्या कमतरतेसोबतच शिक्षण घेणेही काहींना शक्‍य होत नाही. यासाठी हे सर्वेक्षण करण्याची गरज आहे.’’ या वेळी गुजरात ब्राह्मण शाखेच्या यज्ञेश दवे यांनीही ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा अभ्यास करून त्यांना आरक्षण दिले. तसाच अभ्यास केवळ ब्राह्मणच नाही तर सर्वच जातींचा होणे गरजेचे आहे. जातीच्या आधारावरील आरक्षणापेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण असले पाहिजे.- आनंद दवे, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com