agriculture news in Marathi Brazil may import wheat, rice and other millets from India Maharashtra | Agrowon

ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य खरेदीची शक्यता 

कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

दक्षिण अमेरिकन देशांसोबत असलेल्या व्यापार संधींपेक्षा सध्या खूपच कमी व्यापार होत आहे. देशाचा ब्राझीलसोबत व्दिपक्षीय व्यापार २०१८-१९ मध्ये १०५ कोटी डॉलरचा होता. त्यामुळे या देशांसोबतच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. 
- नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री 
 

नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ब्राझील भारताकडून गहू, भात आणि इतर भरडधान्य खरेदीची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्रालयाने दिली. 

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि ब्राझीलच्या कृषिमंत्री टरेझा क्रिस्टीना कोरेआ डा कोस्टा डियाझ यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार संधींबाबत नुकतीच चर्चा झाली. चर्चेमध्ये ब्राझीलच्या कृषिमंत्र्यांनी भारतातून भरडधान्य आयातीसाठी अनुकूलता दर्शविली. 

ब्राझील हा जगात गहू, भात आणि इतर धान्य आयात करणार महत्त्वाचा देश आहे. तर, भारत हा गहू आणि भात उत्पादनातील मोठा देश आहे. ‘‘२०१८-१९ मध्ये भारताचा ब्राझीलसोबत द्विपक्षीय व्यापार १०५ कोटी डॉलरचा होता. व्यापाराच्या संधी उपलब्ध असल्यांपैकी हा आकडा कमी असून भारत आणि दक्षिण अमेरिकन देशांमधील असलेल्या व्यापाराला प्रोत्साहन देण्याची गरज आहे,’’ असे मंत्री तोमर म्हणाले. 

कृषिमंत्री तोमर बैठकीत डियाझ म्हणाल्या, की ब्राझील भारतातून गहू, भात, भरडधान्य, तूर आयात करण्यासंबंधी अनुकूल आहे. ब्राझीलचा शून्य टक्के आयातशुल्काने साडेसात लाख टन गहू आयातीचा कोटा आहे. याचा वापर भारत ब्राझीलला निर्यात करण्यासाठी करतो. ब्राझील दरवर्षी ७० लाख टन गहू आयात करतो. 

ब्राझीलकडून गहू आणि भात आयातीसाठी दाखविलेल्या अनुकूलतेमुळे भारत सरकारलाही दिलासा मिळेल. केंद्राकडे सध्या गहू आणि भाताचा मोठा साठा शिल्लक आहे आणि हा साठा कमी करण्याचा प्रयत्न सरकारने अनेक दिवसांपासून करत आहे. त्यामुळे ब्राझीलसोबत झालेल्या चर्चेनंतर अतिरिक्त गहू आणि भाताची विल्हेवाट लावण्याचे आव्हान कमी होण्याची शक्यता आहे. 

भारताकडे अतिरिक्त बफरस्टॉक 
केंद्राकडे एक जानेवारी रोजी गव्हाचा ३२८ लाख टन एवढा बफरस्टॉक होता. प्रत्यक्षात अन्नसुरक्षाचा विचार करता १३८ लाख टन गव्हाचीच आवश्‍यकता आहे. तसेच ७६ लाख टन भाताच्या बफरस्टॉकची आवश्‍यकता असताना भाताचा २३७ लाख टन साठा आहे. त्यामुळे अतिरिक्त गहू आणि भाताची विल्हेवाट लावण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. हा साठा द्वीपक्षीय व्यापार करारातून कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...