agriculture news in marathi Brazil producing sugar may hit Indian Sugar's Demand | Agrowon

ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?

राजकुमार चौगुले
मंगळवार, 2 जून 2020

यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर निर्मितीवर भर दिल्याने तिथे साखरेचे उत्पादन वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या देशात सुमारे ५५ टक्के अधिक साखर उत्पादित होत आहे.

कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर निर्मितीवर भर दिल्याने तिथे साखरेचे उत्पादन वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या देशात सुमारे ५५ टक्के अधिक साखर उत्पादित होत आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा करू शकते, असा अंदाज साखर तज्ञांचा आहे. ब्राझील यंदा साखर उत्पादन वाढवणार ही शक्यता काही महिन्यांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. आता ती खरी ठरत आहे. मार्चपासून या देशात गाळप हंगाम सुरू झाला आहे.

गेल्या हंगामात ब्राझीलमधील बहुतांशी कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला होता. पण इथेनॉलला समाधानकारक भाव न मिळाल्याने तेथील कारखान्यांनी यंदा साखर उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. तिथे साखरेचे उत्पादन वेगात सुरू झाले आहे. उत्पादित झालेली साखर जागतिक बाजारपेठेत येण्याची शक्यता वाढली आहे. ही साखर बाजारात आल्यास भारतीय साखरेची मागणी घटू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेचा दबदबा असल्याने ही बाब भारतासाठी चिंताजनक ठरत आहे. ब्राझीलच्या दक्षिण क्षेत्राने मे महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत २.५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले. ‘कोरोना’मुळे जगभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये इथेनॉलच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांनी घट झाली. ब्राझीलमध्ये इथेनॉलची तोट्यात विक्री केली जात आहे. हे नुकसान साखर उत्पादनातून भरून काढण्याचे त्यांचे नियोजन आहे.

भारताला निर्यातीचा वेग वाढवावा लागणार
सुरुवातीच्या काळात भारतामध्ये मे महिन्यापर्यंत सर्व प्रकारच्या वस्तूंचा निर्यातीला फटका बसला त्यात साखरेचा ही अपवाद नव्हता. परंतु, मे महिन्यानंतर मात्र स्थिती बदलत गेली. इराण, इंडोनेशियाकडून सातत्याने भारतीय साखरेला मागणी वाढत असल्याने बंदरांवर कमी मजूर असतानाही साखर निर्यातीसाठी प्रयत्न केले गेले. गेल्या महिनाभरात देशातील विविध बंदरांतून एक ते दीड लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे .अजून ही होत आहे. निर्यातीचा वेग मंद असला तरी या काळात ही निर्यात होत आहे याचे समाधान साखर उद्योगाला आहे. पण निर्यातीचा वेग वाढण्याची गरज आहे

ब्राझीलमध्ये वाढणारे साखरेचे उत्पादन ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. भारताला अजूनही निर्यातीची संधी असल्याने कारखान्यांनी जितक्या लवकर शक्य होईल, तितकी साखर निर्यात केली तरच संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार. 


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...