agriculture news in marathi Brazil Sugar affects International Market | Page 4 ||| Agrowon

ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेची आवक अंदाजापेक्षा एक महिना अगोदर सुरू झाली आहे. याचा फटका साखरेच्या दराला बसला आहे.

कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेची आवक अंदाजापेक्षा एक महिना अगोदर सुरू झाली आहे. याचा फटका साखरेच्या दराला बसला आहे. ब्राझीलची साखर बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारे भाव गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आले आहेत.

ब्राझीलमध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात पावसाळी हवामान होते. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे तेथील हंगाम किमान एक महिना लांबेल अशी शक्‍यता होती. यामुळे किमान एक महिना तरी बाजारपेठेत त्यांची साखर येणार नाही अशी अटकळ जगभरातील व्यापाऱ्यांची होती. ब्राझीलची साखर उशिरा आली असती, तरी बाजारभाव तेजीत राहिला असता. त्याचा फायदा भारतासारख्या देशालाही झाला असता. परंतु हा अंदाज मार्चच्या मध्यालाच चुकला. याच कालावधीत ब्राझीलमधील सुमारे तीस कारखाने सुरू झाले. तातडीने ती साखर जागतिक बाजारपेठेत दाखल झाली. याचा ‌‌‌‌‌‌‌प्रतिकूल परिणाम बाजारपेठेवर होऊन दर घसरले. यातच ब्राझीलचे चलन असणाऱ्या रियल मध्येही पडझड झाल्याने एकूणच साखरेचे दर खाली आले. ब्राझीलची साखर येत असल्याने साखर अतिरिक्त होण्याच्या शक्‍यतेने बाजारात अस्वस्थता निर्माण होऊन दर कमी झाले.

मागणी, पुरवठा घटला
फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या साखरेचा दर १७.५ सेंट प्रति पौंड इतका होता. तो आज १४.९२ सेंट प्रति पौंड इतका झाला आहे. रिफाइन पांढऱ्या साखरेचा दर टनास ४७३ डॉलरवरून ४३१ डॉलरपर्यंत खाली आला आहे. साखरेचा पुरवठा व मागणीचे प्रमाण कमी अधिक झाल्याने दर कमी झाले आहेत. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबाबत साशंकता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

भारतीय साखरेला फटका शक्‍य
जागतिक बाजारपेठेत दराच्या घडामोडीचा भारतीय साखरेला थेट फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. साखरेचे करार चांगले होत असले, तरी भविष्यात जर ब्राझीलच्या साखरेची आवक वाढली तर भारतीय साखरेला मागणी कमी येऊन दर आणखी कमी होण्याची शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. 

प्रतिक्रिया..
गेल्या दोन महिन्यांत भारतातून निर्यात होणाऱ्या साखरेच्या दरात घसरण होत आहे. या कालावधीत कच्च्या व रिफाइन दोन्ही साखरेच्या दरात क्विंटलमागे दीडशे रुपयापर्यंत घट झाली आहे. भारतीय चलनानुसार साखरेला २७०० ते २७५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. आता तो २६०० रुपयांपर्यंत घसरला आहे.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...