Agriculture news in marathi Break in cotton procurement in Khandesh | Agrowon

खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 जुलै 2020

जळगावात कापूस खरेदी बंद आहे. कारण, कापूस साठवणुकीसाठी कारखानदारांकडे शेड नाहीत. शेडअभावी खरेदी केलेला कापूस भिजून नुकसान होवू शकते. हे नुकसान केंद्रधारक कारखानदारांना सहन करावे लागेल. शासन ते नुकसान भरून देण्यास तयार नाही. यामुळे खरेदी रखडली आहे. 
- कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगाव

जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील २० ते २५ दिवसांपासून ब्रेक लागला आहे. ज्या खरेदी केंद्रांत कापूस साठवणुकीसाठी शेड आहे, तेथेच सुरू आहे. इतरत्र शेडअभावी ही खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

जळगाव जिल्ह्यात फक्त जामनेर व पहूर येथे खरेदी सुरू आहे. धरणगाव येथेही पणन महासंघातर्फे खरेदी सुरू आहे.  परंतु, इतरत्र खरेदी बंद आहे. जळगाव, बोदवड, भुसावळ, पाचोरा, एरंडोल, भडगाव, धुळे, नंदुरबार, शहादा,  रावेर येथे खरेदी बंद असल्याने संबंधित भागातील किंवा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कापसाची विक्री कुठे करायची? हा प्रश्‍न आहे. 

शासकीय कापूस खरेदी बंद असल्याने बाजारात दर कमी आहेत. सध्या ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाची खरेदी जिनींग प्रेसिंग कारखाने व खेडा खरेदीमध्ये केली जात आहे. जळगाव व इतर भागात मध्यंतरी खरेदीसाठी आणखी नव्या केंद्रांची किंवा कारखान्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात होती. कारण, यंत्रणेवरचा ताण वाढत होता. हा ताण वाढलेला असतानाच पावसाळा सुरू झाला आणि जेथे खरेदी केंद्र नियुक्त केले होते. त्या जिनींग, प्रेसिंग कारखान्यांमध्ये पावसाळ्यात कापूस ओला होवून नुकसान टाळण्यासाठी साठवणुकीसंबंधीचे शेड नसल्याने खरेदी बंद झाली.

आठ लाख क्विंटल कापूस शिल्लक

सध्या पाचोरा, जामनेर, जळगाव, चोपडा, यावल या भागात मिळून सुमारे आठ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. कापसाची खरेदी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. परंतु, खरेदी केंद्रधारक कारखानदार कापूस ओला होईल, नुकसान टाळता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित करून खरेदीस नकार देत आहेत, अशी स्थिती खानदेशात आहे.


इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...