agriculture news in marathi break in FRP will disturbe farmers economy Says Sajjid Mulla | Page 2 ||| Agrowon

‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी देशोधडीला लागणार : साजिद मुल्ला

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात शेतकरी सरकारला धडा शिकवतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला. 

कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात शेतकरी सरकारला धडा शिकवतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला. 

श्री. मुल्ला म्हणाले, की निती आयोगाला पुढे करून राज्य आणि केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कुटिल डाव रचत आहे. पहिली उचल ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना हंगाम संपण्यापूर्वी अथवा हंगाम संपल्यानंतर दोन टप्प्यांत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला राजकीय व्यासपीठ सोडून विरोध करायला पाहिजे. एफआरपी म्हणजे ऊस गाळप झाल्यानंतर उसाची बिले १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे हा कायदा आहे. तरीही अनेक साखर कारखान्यांनी उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत. 

ते म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील किसनवीर कारखाना भुईंज, फलटण तालुक्यातील स्वराज कारखान्याने शेतकऱ्यांची उसाची बिले दिली नाहीत. एफआरपीचे तीन तुकडे केल्यामुळे तर शेतकरी पुरता अडचणीत सापडणार आहे. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळणार नाहीत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी सोसायटीमधून काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी हेक्टरी नऊ ते दहा हजारांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांतून विरोध होऊ लागला आहे.

अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये 
निर्माण झाली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात शेतकरी राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...