agriculture news in Marathi, break in rain for a week, Maharashtra | Agrowon

आठवडाभर पावसाचा खंड कायम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मॉन्सूनच्या आसाची नैसर्गिक स्थिती बदलून तो उत्तरेकडे म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला तर उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडतो, त्या वेळी मध्य भारतात पाऊस कमी असतो. हीच स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे. मात्र पुढच्या आठवड्यापासून मध्य भारतात मॉन्सून पुन्हा सक्रीय होऊन पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 
- के. एस. होसळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, हवामान विभाग

पुणे : महाराष्ट्रात मॉन्सूनने चांगली सुरवात केल्यानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आणखी आठवडभर राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून (ता. १६) पावसाला पोषक स्थिती तयार होणार असल्याने राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.  

गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये माॅन्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होत असल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसातील या खंडाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा परतीच्या पावसावरच असून, आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) गुरुवारी (ता. ९) प्रसिद्ध करण्यात आलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य माॅन्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मॅान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस अधिक असेल. तर राज्यात मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार, उर्वरित भागात हलक्या सरी पडतील. १३ ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. माॅन्सूनचा आसही दक्षिणेकडे येऊन तिसऱ्या आठवड्यात (१६ ते २२ ऑगस्ट) महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया
महाराष्ट्रात हवेचा दाब वाढला असून, उत्तर महाराष्ट्रात हे दाब १००६ तर दक्षिणेकडे १००८ हेप्टपास्कल झाले अाहेत. वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. सध्या राज्यात मॉन्सूनला जोर राहिलेला नाही. आठवडाभरात उत्तर भारतात पाऊस अधिक असेल, कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर त्यानंतर १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
-डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

इतर अॅग्रो विशेष
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...