Agriculture news in marathi Breaking the law Report crime against officials: Demand of Ambeohal dam victims | Agrowon

कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा : आंबेओहळ धरणग्रस्तांची मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा असताना पोलिस बंदोबस्तात आंबेओहळची घळभरणी करणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंबेओहळ धरणग्रस्तांनी केली.

उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा असताना पोलिस बंदोबस्तात आंबेओहळची घळभरणी करणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंबेओहळ धरणग्रस्तांनी केली. धरणग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पोलिस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ उत्तूर (ता. आजरा) येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ धरणग्रस्तांनी लाक्षणिक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात झाली. शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

शिवाजी गुरव म्हणाले, ‘‘स्थानिक लोकप्रतिनिधी लाभधारक शेतकऱ्यांच्या मताचा गठ्ठा डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहेत. अधिकाऱ्यांनी घळभरणीचे काम बंद ठेवून पुनर्वसनाच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे.’’ जनता दलाचे तालुका अध्यक्ष सदानंद व्हनबट्टे, नाना पुंडपळ, श्रीराम चौगुले, सदा शिवणे, दाजीबा पोटे, विशाल गुरव उपस्थित होते. 

दरम्यान, आंबेओहळ प्रकल्प विकास परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामध्ये आंबेओहळ प्रकल्पस्थळावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत बैठक झाली. या वेळी ३१ जानेवारी पूर्वी पुनर्वसन पूर्ण होईल, असे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू ठेवले व पुनर्वसन मात्र रखडत ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांनी घळभरणीला परवानगी दिली आहे का? नसेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व दिली असेल तर धरणग्रस्थांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी, म्हणजे धरणग्रस्त घळभरणीमध्ये उड्या मारून आत्महत्या करतील, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर सचिन पावले, महादेव खाडे, राजू देशपांडे, सागर सरोळकर यांच्यासह धरणग्रस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...