Agriculture news in marathi; Bride injured in attack | Agrowon

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी दांपत्य जखमी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात गेलेल्या चव्हाण दांपत्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना नुकतीच कवली शिवारात घडली. 

पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात गेलेल्या चव्हाण दांपत्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना नुकतीच कवली शिवारात घडली. 

वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथील शेतकरी भारत सरिचंद चव्हाण (वय ३०) यांची मुरडेश्वर खोऱ्यालगत कवली (ता. सोयगाव) शिवारात शेती आहे. रविवारी (ता. २१) शेतकरी भारत चव्हाण व त्यांची पत्नी मनीषा भारत चव्हाण (वय २५) या निंदणीच्या कामासाठी आपल्या लहान दोन मुलांसह शेतात गेले होते. तण नियंत्रणाचे काम ते करीत होते. त्यांनी नजीकच्या झाडाला झोक्‍यात बाळाला झोपविले होते. बाळाला झोका देण्यासाठी मनीषा गेल्या. त्या वेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. पत्नीची आरडाओरड ऐकून भरत चव्हाण हे पत्नीला वाचविण्यासाठी गेले असता, बिबट्याने मनीषा हिला सोडत भरत चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

बिबट्याच्या या हल्ल्यात भरत चव्हाण यांच्या डोळ्याखाली, उजवा हात व पोटावर जबर जखमा, तर मनीषा चव्हाण यांच्या खांद्याला जबर जखमा झाल्या आहेत. मनीषा चव्हाण यांनी आरडाओरड केली. मग गुराखी व शेतकरी विष्णू प्रल्हाद पाटील, मनोज सुभाष पाटील हे एकत्र आले. त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे चव्हाण दांपत्याचे प्राण वाचले. या घटनेतील जखमी चव्हाण हे अल्पभूधारक असून, घरची शेतीकामे आटोपून ते मोलमजुरी करतात. जखमींवर सुरवातीला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व नंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णालयात हालविण्यात आले आहे.

या परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरात होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...