Agriculture news in marathi; Bridge and dam at Ner; Successful experiment in water conservation of public works department | Agrowon

नेर येथे पूल आणि बंधारा ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग

गणेश राऊत
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नेर, यवतमाळ : जलयुक्त शिवारावर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रयोग करून नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. जलसंधारणासाठी पुलाचा यशस्वी वापर करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा प्रयोग केला आहे.

नेर, यवतमाळ : जलयुक्त शिवारावर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रयोग करून नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. जलसंधारणासाठी पुलाचा यशस्वी वापर करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा प्रयोग केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागानेही जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव यांच्या पुढाकारात चंद्रपूर येथे प्रशिक्षण घेण्यात आले होते. शिबिराला अधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की रस्ते, इमारती किंवा पूल बांधणे, एवढेच मर्यादित लक्ष्य असते. मात्र, हे पूल बांधताना त्या पुलाखाली ‘पूल-कम-बंधारा’ बांधला तर जलसंधारण मोठ्या प्रमाणात होऊ शकते, ही मूळ संकल्पना या शिबिराची होती. यातूनच ‘इलिप्टिकल शेप’मध्ये ‘पूल-कम-बंधारा’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपलीकर, अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांच्या मार्गदर्शनात नेर उप विभागाचे सहाय्यक अभियंता भूपेश कथलकर आणि हर्षद ठाकरे यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. 

पिंपरी कलगा ते मारवाडी या रस्त्यावर एक करोड ८३ लाख रुपयांच्या पुलाचे निर्माण करण्यात आले. या पुलाखाली एक मृत नाला होता. बाजूला असलेल्या वाळकी येथील तलावाचे झिरपणारे पाणी या नाल्यातून जात होत. मात्र, तो नाला पावसाळ्यातच कोरडा व्हायचा. दीड फूट खोल आणि बारा मीटर रुंद असलेल्या या नाल्याला जिवंत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. सुरुवातीला हा नाला दोन मीटर खोल करण्यात आला. त्याची रुंदी ३० मीटर पर्यंत वाढविण्यात आली. बाजूच्या तलावाचे झिरपणारे पाणी अडविले पाहिजे, यासाठी ‘इलिप्टिकल’ आकाराचे बंधारे पुलाच्या खाली बांधण्यात आले. या बंधाऱ्याला अंदाजे पंधरा लाख रुपये नाममात्र खर्च आला. 

जलसंपदा विभागाच्या नियमानुसार एक क्युसेस पाणी थांबण्यासाठी एक लाख ७४ हजार रुपये खर्च येतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ १५ लाख रुपये खर्च करून २० क्युसेस पाणी अडविण्यात यश मिळविले आहे. जवळपास साडेसातशे मीटर लांब असे थांबलेले पाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.  कंत्राटदार गोपाल अग्रवाल व अशोक पाटील यांनी या ‘पूल-कम-बंधाऱ्या’चे काम पूर्णत्वास नेले आहे. 

जलसंधारणाचे आदर्श मॉडेल
या बंधाऱ्यामुळे जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. सभोवताल असलेल्या विहिरींची जलपातळी वाढणार आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. वाहत्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास जलक्रांतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. हा बंधारा आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...
सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर...लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर,...
उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी...पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर...
वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः...नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून...
सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे ‘आधार’ रखडलेपुणे: शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात...
गोंदिया : सौरकृषिपंप उभारणीचे कार्यादेश...गोंदिया  ः राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री...
वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भराकोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व...
कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्रीइस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला...
अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस...अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
उत्तर महाराष्ट्रात अधिक गारठापुणे : राज्यात गारठा वाढला असला तरी, किमान...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...