सोलापूरातील कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा : डॉ. दीपक म्हैसेकर

सोलापूर : ‘‘सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा’’, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता.६) येथे दिल्या.
Bring more coherence to the solutions : Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar,
Bring more coherence to the solutions : Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar,

सोलापूर  : ‘‘सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा’’, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता.६) येथे दिल्या.  

सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पी. शिव शंकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, वैंशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचा सामना केवळ वैद्यकीय आघाडीवर करुन चालणार नाही. त्यासाठी सर्व विभागांत जास्तीत जास्त सूसूत्रता असायला हवी. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आणि यामध्ये कार्यरत असणारे सर्व विभाग यामध्ये समन्वय असायला हवा. सोलापुरात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या बाधेमुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. येथून पुढे मृत्यू न होण्यासाठी उपचाराच्या स्टॅंडर्ड प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी करा. अतिदक्षता विभागांतील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्याचबरोबर मरण पावलेल्या व्यक्तींच्या आरोग्य विषयक संदर्भाचे विश्लेषण करा. त्यानुसार उपचारात काही सुधारणा करता येणे शक्य आहे का ते तपासून घ्या.    डॅा. म्हैसेकर यांच्या सूचना...  

  • कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर आणि नर्स ठेवा. 
  • खासगी इंटेसिव्हीस्ट डॉक्टरांची मदत घ्या. 
  • शहरातील सर्व्हे करताना थर्मल स्कॅनरचा वापर करा 
  • कंटेनमेंट झोनमध्ये मास्क वितरीत करा 
  • कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष ठेवा 
  • गृहरक्षक दलाचे मनुष्यबळ वापरा 
  • पोलिसांना मास्क, फेसशिल्ड, गॉगल द्या 
  • स्थलांतरित मजूरांना जाण्या, येण्याचे नियोजन नीट करा 
  • जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करा 
  • हॉट-स्पॉट शहरांतून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष द्या.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com