Agriculture news in Marathi Bring oilseeds and edible oil | Agrowon

तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे.

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विकास सोसायट्या, शेतकरी महिला गटांनी पुढाकार घेऊन छोटे प्रकल्प उभारल्यास खाद्यतेलात खेडी स्वयंपूर्ण होण्यास मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर म्हणाले, की गुजरातहून तेलबियांच्या गाळपाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची मशिन कृषी महाविद्यालयाने खरेदी केलेली आहे. आठ तासांत सुमारे पन्नास किलो तेलबियांचे गाळप करण्याची क्षमता असलेले हे मशिन आहे. खाद्यतेलांच्या खरेदीमध्ये भेसळ नसलेल्या शुद्ध तेलाचा आग्रह ग्राहकांचा राहतो. त्यामुळे शेतकरी, ग्राहकांनी स्वतःच तेलबिया या ठिकाणी आणून समक्ष खाद्यतेल घेऊन जाण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. विकतचे खाद्यतेल खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या तेलबिया गाळपातून तेलाची उपलब्धता वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा छोटासा प्रकल्प आहे.

कोणत्या तेलबियांचे होणार गाळप
शुद्ध खाद्यतेलांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, मोहरी आदी तेलबियांचे गाळप या ठिकाणी होईल. ग्राहकांना तेलबियांच्या गाळपातून खाद्यतेल आणि पेंड घेऊन गेल्यास प्रति किलो तीस रुपये शुल्क आकारणी होईल. तर केवळ तयार खाद्यतेल नेल्यास १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अर्थशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...