राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३००० रुपये

वांगी
वांगी

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ६०० ते ९०० रुपये औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) वांग्याची आवक ३७ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये वांग्याची आवक व दरात चढउतार कायम राहिला आहे. ३१ मार्चला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ मार्चला ५७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ५०० ते ८०० रुपये राहिले. २७ मार्चला ५४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटचा दर मिळाला. २ एप्रिलला वांग्याची आवक ६३ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर हाेता. ७ एप्रिलला ५५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ९६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला २०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ एप्रिलला ८० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ एप्रिलला ३० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. पुण्यात प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) विविध वांग्यांच्या वाणांची सुमारे १० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपयांपर्यंत दर हाेते. सध्या आवक जास्त असून मागणी कमी असल्याने दर सरासरी असल्याचे सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीमध्ये पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून विविध वाणांच्या वांग्यांची आवक हाेत अाहे. यामध्ये प्रामुख्याने हिरवी, जांभळी, भरताची माेठी वांगी आणि लांब आकाराच्या वांग्यांचा समावेश आहे. नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये नगर ः नगर बाजार समितीत वांग्यांची आज २० क्विटलची आवक झाली व २०० ते १००० व सरासरी ६०० रुपयांचा दर होता. मागील महिन्यापेक्षा आता काहीसा दर वाढला आहे. नगर बाजार समितीत दररोज सरासरी २० ते २५ क्विंटलची आवक होत असते. १९ एप्रिल ला  २० क्विंटल ची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर होता. १२ एप्रिल रोजी १७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० व ८५० रुपयांचा सरासरी दर होता. ५ एप्रिल रोजी १५ क्विंटल ची आवक होऊन १०० ते ५०० व ३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. गेल्या महिनाभराचा विचार करता वांग्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. आवक मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. जळगावात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभरापासून वांग्यांना अपेक्षित दर शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. वांग्याची आवक टिकून आहे. सरासरी दर महिनाभर ५०० रुपये प्रतिक्विंटल एवढाच राहीला. दर कमी मिळत असल्याने जळगाव व यावल तालुक्‍यातील तापीकाठानजीकच्या गावांमधील वांगी उत्पादकांनी पीक मोडले. सध्या बाजार समितीत एरंडोल व जळगाव येथून वांग्यांची आवक अधिक आहे. यापाठोपाठ पाचोरा तालुक्‍यातूनही काही प्रमाणात आवक होत आहे. प्रतिदिन १८ क्विंटल आवक मागील २० ते २५ दिवस राहिली आहे. कमाल दर ६५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक नव्हते, अशी माहिती मिळाली. आवक अजूनही टिकून आहे. हिरव्या काटेरी वांग्यांचा लिलाव लवकर होतो. काळ्या व मोठ्या आकाराच्या वांग्यांना फारशी मागणी नाही. परभणीत प्रतिक्विंटल २०००  ते ३००० रुपये परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२६) वांग्याची २० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २०००  ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून आवक येत आहे.  महिनाभरात प्रत्येक गुरुवारी सरासरी २० ते ४० क्विंटल आवक झाली. गुरुवारी (ता.२६) २० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. नाशिकला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी (ता.२५) वांग्याची २३० क्विंटलची आवक झाली. या वेळी वांग्याला प्रतिक्विंटलला ५०० ते १५०० रुपये व सरासरी १००० रुपये दर मिळाले. मार्च महिन्यात वांग्याची आवक सरासरी २०० क्विंटल होती. त्या वेळी वांग्याचे दर क्विंटलला ५०० ते २२०० व सरासरी १५०० होते. मात्र, एप्रिल महिन्यात वांग्याच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाली. याचकाळात देशातील इतरही बाजारपेठांत वांग्याची स्थानिक आवक वाढली आहे. परिणामी, वांग्याचे दर क्विंटलला ५०० ते १५०० यादरम्यानच स्थिर राहिले आहेत. अजून पंधरा दिवस तरी वांग्याच्या दराची ही स्थिती कायम राहील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत वांग्याची दररोज सुमारे १०० ते १५० करंड्यांची अावक (प्रतिकरंडी ३० किलो) होत आहे. गुरुवारी (ता. २६) १५० करंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये असा दर होता. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील कवठेपिरान, तूंग, दूधगाव, आष्टा, मिरज; तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून वांग्याची आवक होते. बुधवारी (ता. २५) वांग्याची १५० करंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २४) वांग्याची १०० करंड्याची आवक झाली होती. त्यास प्रति दहाकिलोस १०० ते १५० रुपये असा दर होता. शिवाजी मंडईत गतसप्ताहापेक्षा वांग्याची आवकीत घट झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. साताऱ्यात प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न समितीत गुरुवारी (ता.२६) वांग्याची २४ क्विंटल आवक झाली.  वांग्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाला आहे. वांग्याचे दर एप्रिलपासून क्विंटलला ५०० ते १२०० यादरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. बाजार समितीत कोरेगाव, फलटण, खटाव, सातारा तालुक्‍यातून आवक होत आहे. पाच एप्रिलला वांग्याची १५ क्विंटल आवक झाली असून, वांग्यास ८०० ते १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. १२ एप्रिलला २४ क्विंटल आवक होऊन वांग्यास क्विंटला १००० ते १५०० रुपये दर मिळाला आहे. १९ एप्रिलला ३० क्विंटल आवक झाली असून, ५०० ते १००० रुपये दर मिळाला आहे. वांग्याची १५ ते २० रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com