agriculture news in Marathi, Brinjal 300 to 5000 rupees in the state | Agrowon

राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मार्च 2019

पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो 
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) विविध वाणांच्या वांग्याची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला सरासरी १०० ते २५० रुपये दर होते. हे दर तेजीत असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये वांग्याची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. सध्याची आवक ही सरासरी असून, दर मात्र वाढलेले असल्याचे आडतदारांनी सांगितले.

पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो 
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) विविध वाणांच्या वांग्याची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला सरासरी १०० ते २५० रुपये दर होते. हे दर तेजीत असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये वांग्याची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. सध्याची आवक ही सरासरी असून, दर मात्र वाढलेले असल्याचे आडतदारांनी सांगितले.

नाशिकात प्रतिदहा किलोस १७० ते ३२५ रुपये 
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याची आवक स्थिर आहे. बुधवारी (ता. ६) वांग्याची आवक २४२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस १७० ते ३२५ रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, संगमनेर, निफाड या तालुक्यांतून वांग्याची आवक होते. मंगळवारी (ता. ५) वांग्याची आवक १६४ क्विंटल झाली. त्यास २००० ते ३७०० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी २६०० रुपये दर होता. सोमवारी (ता. ४) १६६ क्विंटल आवक होती. त्यास २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी भाव २७५० रुपये मिळाला. वांग्याची आवक सर्वसाधारणपणे कमी होती. बाजारभाव चांगले मिळत आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ७) वांग्याची ७० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, करडगाव, हिंगला, कोक आदी गावांतून वांग्याची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी वांग्याची ४० ते ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते १८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ७) वांग्याची ७० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये होते. तर किरकोळ विक्री २० ते ३० रुपये किलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३०० ते १८०० रुपये 
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने वांग्याला प्रतिक्विंटल कमाल १८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ४० क्विंटल इतकी आवक राहिली. आवकेत काही प्रमाणात चढ-उतार होत राहिला. पण दर मात्र टिकून राहिले. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि कमाल १८०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही दर किमान २०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि कमाल १५०० रुपये दर मिळाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यातही वांग्याची आवक २० ते ३० क्विंटल पर्यंत राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २५० रुपये, सरासरी १००० रुपये आणि कमाल २००० रुपये असा दर मिळाला. त्याच्या प्रतिक्विंटलमागे १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

जळगावात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची गुरुवारी (ता. ७) १८ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये दर मिळाला. आवक महिनाभरापासून स्थिर आहे. हिरव्या, लहान काटेरी वांग्यांना बऱ्यापैकी उठाव आहे. दरात मागील पाच-सहा दिवसांत क्विंटलमागे ७० ते ८० रुपयांची सुधारणा झाली आहे. भरताच्या वांग्यांची आवक घटली असून, त्यांनाही प्रतिक्विंटल १२०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. पुढे वांग्यांची आवक कमी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. काटेरी वांग्यांची आवक धरणगाव, जळगाव, जामनेर व औरंगाबाद जिल्ह्यांतील घाट परिसर, सोयगाव तालुक्‍यांतून होत आहे. तर भरताच्या वांग्यांची आवक भुसावळ, जळगाव भागांतून होत असल्याची माहिती मिळाली.

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये
अकोला ः येथील जनता भाजी बाजारात वांग्यांचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत. लग्नसराईची धामधूम वाढल्यास दरांमध्ये तेजीची शक्यता वाढू शकते, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. वांगे सध्या कमीत कमी ८०० ते जास्तीत जास्त १५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकत आहेत. सरासरी १००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला दर पदरात पडत आहे.  येथील बाजारात वांग्यांची आवक सध्या एक टनापेक्षा अधिक आहे. तुलनेने दर मात्र स्थिर आहेत. बाजारात वांग्यांची आवक प्रामुख्याने अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागातून होत आहे. बाजारात ग्राहकांना वांगी सध्या ३० ते ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत. लग्नसराई वाढल्यास वांग्यांची मागणी अधिक होते. अशावेळी दरांमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सांगलीत प्रतिदहा किलोस ४५० ते ५०० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत वांग्याची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. त्यामुळे वांग्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ७) वांग्याची २५० ते ३०० क्रेट (एक क्रेट १५ ते १८ किलोचे) आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस ४५० ते ५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
वांग्याची आवक सांगली जिल्ह्यातील आष्टा, मिरज, दूधगाव, तुंग, कवठेपिरान यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून होते. बुधवारी (ता. ६) वांग्याची २०० ते २५० क्रेटची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ५५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ५) वांग्याची २५० ते ३०० क्रेटची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ४५० ते ५०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. ४) वांग्याची २५० ते ३०० क्रेटची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ४५० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सध्या वाढत्या उन्हामुळे वांग्याची आवक घट झाली आहे. त्यामुळे दरात किंचित वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाने सांगितले.

नगरला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये
नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) वांगीची ११८ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वांगीची बऱ्यापैकी आवक होत असते. अलीकडच्या काळात आवक वाढली आहे. २६ फेब्रुवारीला ४४ क्विंटलची आवक होऊन  ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. २१ फेब्रुवारीला ३७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. १६ फेब्रुवारीला ६४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १६०० व सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला. ७ फेब्रुवारीला ८४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. गेल्या महिनाभरात वांगीची आवक स्थिर राहिली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...