राज्यात वांगी ४०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात वांगी ४०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात वांगी ४०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) वांग्याची सुमारे ८ ते १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १०० ते २०० रुपये दर होता. बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या रंग आणि आकाराच्या वांग्याची आवक होत असून, यामध्ये हिरवी, जांभळी, भरताच्या वांग्याचा समावेश आहे. सध्याचे दर हे कमी असून, सरासरी दर हे २०० ते ४०० रुपयांपर्यंत असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

सातारा प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २२) वांग्याची ३६ क्विंटल आवक झाली. वांग्यास क्विंटलला ८०० ते १५०० असा दर मिळाला आहे. वांग्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. कोरेगाव, सातारा, फलटण तालुक्यात वांग्याची बहुतांशी आवक होत आहे. वांग्याची रविवारी (ता. १८) १९ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १५०० ते २५०० असा दर मिळाला आहे. १३ नोव्हेंबरला वांग्याची १७ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १००० ते २००० असा दर मिळाला आहे. मंगळवारी वांग्याच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्यास २० ते २५ रुपयाने किरकोळ विक्री केली जात आहे.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याची दररोज नऊशे ते एक हजार करंड्या (प्रतिकरंडी दहा किलो) आवक होत आहे. वांग्यास दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहापासून वांग्याच्या आवकेत वाढ होत असल्याचे बाजार समिच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. यामुळे वांग्याच्या आवकेत कधी वाढ तर कधी घट होत आहे. बाजार समितीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्‍याबरोबर सांगली जिल्ह्यातून वांग्याची आवक होते. पंधरवड्यापूर्वी उष्णतेत वाढ झाल्याने वांग्यावर किडीचा प्रादुर्भाव जास्त होत होता. यामुळे आवकेत काहीशी घट होती. गेल्या सप्ताहापासून आवकेत वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३००० हजार रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणीमुळे वांग्याला उठाव मिळाला. प्रतिक्विंटलला सर्वाधिक तीन हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. वांग्याची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. रोज जेमतेम १० ते १५ क्विंटल इतकी आवक झाली. संपूर्ण सप्ताहभर अशीच स्थिती राहिली. पण मागणी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून राहिले. वांग्याला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्याची आवक जेमतेम २०० ते ३०० क्विंटलपर्यंत झाली. तर दर किमान ४०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा मिळाला. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही संपूर्ण सप्ताहात आवक साधारण ५०० क्विंटलपर्यंत राहिली आणि दर प्रतिक्विंटलला किमान ५५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा मिळाला.सध्या बाजारातील आवकेचे प्रमाण आणि मागणी यामध्ये मोठी तफावत होते आहे. त्यामुळे वांग्याचे दर काहीसे टिकून आहेत. येत्या आठवडाभरात आवकेची परिस्थिती अशीच राहिली, तर दर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १६५० रुपये अकोला ः येथील जनता भाजी बाजारात वांग्यांचे दर कमीत कमी अाठशे ते जास्तीत जास्त १६५० रुपयांपर्यंत होते. दोन टनांपेक्षा अधिक अावक झाली होती. वांग्यांच्या दरांमध्ये सध्या थोडी घसरण झालेली दिसून येत अाहे. गेल्या काळात वांगी कमीत कमी १२०० रुपये क्विंटलपेक्षा अधिक दराने विकत होती. अाता हा दर ८०० रुपयांपर्यंत खालावला अाहे. बाजारपेठेतील मागणीतही घट असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे अाहे. भरताची वांगी सध्या अधिक प्रमाणात ग्राहकांकडून मागणी केली जात असून, ही वांगी १००० हे १५०० दरम्यान विक्री होत असल्याचे सांगण्यात अाले. अकोलासह लगतच्या जिल्ह्यातून वांग्यांची अावक सध्या सुरू अाहे. तर भरताची वांगी प्रामुख्याने खानदेशातून येथे विक्रीसाठी येत अाहेत.

जळगावात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात वांग्यांची आवक वाढली आहे. गुरुवारी (ता. २२) वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. किमान ५०० व कमाल १००० तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक जामनेर, पाचोरा, औरंगाबाद जिल्ह्यांतील घाट परिसर, जळगाव आदी भागातून होत आहे. मागील पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी २५ क्विंटलपर्यंतची आवक होती. परंतु, सध्या आवक वाढल्याने दर काहीसे कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. काटेरी हिरव्या वांग्यांना अधिक मागणी आहे. त्यांची आवक जामनेर भागातून अधिक होत आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २२) वांग्यांची ६० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. सध्या येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड आदी गावातून वांग्याची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३० ते ६० क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) वांग्याची ६० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये होते. तर किरकोळ विक्री २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ४०० ते ९०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) वांग्याची ७९ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला ४०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० ऑक्‍टोबरला २६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ नोव्हेंबरला वांग्याची आवक ३७ क्‍विंटल तर दर ७०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ नोव्हेंबरला ५१ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ नोव्हेंबरला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ नोव्हेंबरला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, तर १८ नोव्हेंबरला वांग्याची आवक ७६ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गुरुवारी (ता. २२) वांग्याची ७० क्विटंलची आवक झाली आणि प्रतिक्विंटलला ५०० ते २५०० रुपये दर मिळाला. नगरला वांग्याच्या आवकेत आणि दरातही सातत्याने चढउतार होत आहे. नगर बाजार समितीत साधारण शंभर क्विटंलपर्यंत वांग्याची अवाक होत असते. १५ नोव्हेंबरला ४९ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ८ नोव्हेंबरला ३६ क्विंटलची आवक होऊन १००० ते ५००० रुपये दर मिळाला. १ नोव्हेंबरला २४ क्विंटलची आवक होऊन १००० ते ४५०० रुपये दर मिळाला. २५ आॅक्‍टोबरला ३५ क्विंटलची आवक होऊन १००० ते ४००० रुपये दर मिळाला. १८ आॅक्‍टोबरला २२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० रुपये दर मिळाला. ११ नोव्हेंबरला ४७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २५०० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. दुष्काळाचा वांगी आवकेला काहीसा फटका बसत असून आवकेत सातत्याने चढउतार होत आहे.

सांगलीत प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत वांग्याची गतसप्ताहापेक्षा २० क्रेटने आवक वाढली आहे. गुरुवारी (ता. २२) वांग्याची १५० क्रेट ते २०० क्रेट (एका क्रेटमध्ये २० ते २५ किलो) आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस या तालुक्‍यांसह शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. बुधवारी (ता. २१) वांग्याची १५० ते २०० क्रेट आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २०) वांग्याची २०० ते २५० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ३५० ते ४५० रुपये असा दर मिळाला. वांग्याच्या आवकीत वाढ झाली असली तरी दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी इकबाल बागवान यांनी दिली. पुढील सप्ताहात वांग्याच्या दरात काहीशी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com