जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
बाजारभाव बातम्या
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात तेजी
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवडा आणि काकडीला मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण, मागणीतील सातत्यामुळे त्यांच्या दरातील तेजी संपूर्ण सप्ताहभर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवडा आणि काकडीला मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण, मागणीतील सातत्यामुळे त्यांच्या दरातील तेजी संपूर्ण सप्ताहभर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी आणि काकडीची आवक रोज प्रत्येकी ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली, तर घेवड्याची आवक काहीशी कमी होती. रोज ५ ते १० क्विंटल एवढीच आवक राहिली. पण वांगी, काकडी आणि घेवड्याला मागणी वाढल्याने आणि संपूर्ण सप्ताहभर मागणीत सातत्य राहिल्याने त्यांचे दर तेजीत राहिले. वांगी आणि काकडीच्या दरात या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली.
वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, घेवड्याला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर काकडीला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरचीचे दर या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिले.
ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये तर हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याचे दरही काहीसे स्थिर राहिले. कोथिंबिर, मेथी, शेपू या भाज्यांची आवक प्रत्येकी दहा हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ४०० रुपये, मेथीला ३०० ते ५०० रुपये आणि शेपूला २५० ते ४५० रुपये असा दर मिळाला.
- 1 of 40
- ››