agriculture news in Marathi brinjal include in produce which sell Maharashtra | Agrowon

`विकेल ते पिकेल’ संकल्पनेत भरिताची वांगी, दादर ज्वारीही 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात भरिताची वांगी व दादर ज्वारीचा समावेश झाला आहे.

जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात भरिताची वांगी व दादर ज्वारीचा समावेश झाला आहे. यामुळे भरिताची वांगी व ज्वारीच्या पणन, प्रक्रिया कार्यवाहीत सुधारणा, गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

या अंतर्गत जळगाव शहरात ग्राहकांना पोच किंवा थेट भरिताची वांगी विक्रीचा उपक्रम राबविला जाणार आहे. आसोदा, नशिराबाद भागातील वांगी उत्पादकांचा यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तसेच भरिताच्या वांग्याची विक्री करण्यासाठी जळगाव शहरात ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन व पालिकेची मदत घेतली जाईल. भरिताच्या वांग्याचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. तो जानेवारीपर्यंत जोमात सुरू असतो. जळगाव शहरात भरीत-भाकरी विक्रेत्यांनाही वांग्यांची गरज असते. यातही थेट विक्रीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

वांग्यांची पुणे, मुंबईत पाठवणूक करण्यासाठी अनुदान मिळेल का, यावरही काम केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी करण्याची तयारी केली आहे. तसेच वांग्यावर प्रक्रिया करून भरिताची विक्री महानगरांमध्ये करण्यासंबंधीदेखील शासनाचे प्रोत्साहन कसे मिळेल, याबाबत कार्यवाही केली जाईल. 

यासंदर्भात लवकरच वांगी थेट विक्रीचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच ज्वारीची थेट विक्री, इतर बाजारांमध्ये पाठवणूक, प्रक्रिया याबाबतही कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...