नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते ६५०० रुपये

नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते ६५०० रुपये
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते ६५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची ७३ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ४५०० ते ६५०० रुपये असा दर होता. त्यास सरासरी ५५०० रुपये दर राहिला, अशी माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारात फ्लॉवरची आवक १४४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७८० ते २२१० रुपये दर होता. सरासरी दर १८५७ रुपये राहिला. कोबीची आवक २१४ क्विंटल झाली. तिला सरासरी ११२५ ते २५८३ रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर १९६८ राहिले. ढोबळी मिरचीची आवक ११८ क्विंटल झाली. तिला २०६० ते ३७५० रुपये दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. 

भोपळ्याची आवक २४० क्विंटल होती. त्यास १००० ते २००० रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर १६३० राहिला. कारल्याची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास १८३० ते २९१६ रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर २२५० राहिला. दोडक्याची आवक २३ क्विंटल झाली. त्यास २९१६ ते ५८३६ रुपये असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ४५८३ राहिला. गिलक्याची आवक ४ क्विंटल होती.त्यास २००० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर २९०० राहिला. 

भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० रुपये दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. गवारीची आवक ८ क्विंटल झाली. तिला २५०० ते ५५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ४००० राहिला. डांगराची आवक ४० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १२०० राहिला. 

काकडीची आवक १५ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३००० रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. लिंबाची आवक ८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. बटाट्याची आवक १७४३ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० रुपये दर होता. सर्वसाधारण दर ९०० होता. 

उन्हाळ कांद्याची आवक ११८० क्विंटल झाली. त्यास ८५० ते १७०० रुपये दर होता. सर्वसाधारण दर १४५० राहिला. लसणाची आवक २५ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ३००० ते ११५०० रुपये दरम्यान होता. सरासरी दर ९००० होता. हिरवी मिरचीची आवक १०५ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर १२०० ते २००० रुपये दरम्यान होता. सरासरी दर १६०० होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com