जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २०) भरताच्या वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २६०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात कोबीची १५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये मिळाला. आल्याची २८ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बीटची सात क्विंटल आवक झाली. बिटाला प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. २१०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १९०० ते ३१०० रुपये दर होता. डाळिंबाची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. 

गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १३०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २७०० रुपये दर होता.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com