मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांकडून कांदा विक्री

मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांकडून कांदा विक्री
मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांकडून कांदा विक्री

येवला, जि. नाशिक ः शेतातून काढणी केलेला लाल कांदा किती दिवस ठेवणार, हा प्रश्‍न असल्याने शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करत आहेत. त्यामुळे आठवड्यात येथील बाजार समितीत मोठी आवक होऊन आवार फुल झाले होते. सद्यःस्थितीत ५० पैसे ते साडेतीन रुपये किलोचा भाव कांद्याला मिळत आहे.

या आठवड्यात येवला व अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढलेली होती, तर बाजारभावात घसरण सुरूच राहिली. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत व परदेशांत दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर या ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांदा आवक ५४ हजार ३२२ क्‍विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव ५० ते ५४८, तर सरासरी ३७५ रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक ३७ हजार ८६९ क्‍विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव ५० ते ५३६, तर सरासरी ३८० रुपये क्‍विंटलपर्यंत होते.

मिळणाऱ्या या भावाने उत्पादनखर्चही निघणे अवघड होत आहे. मात्र नाईलाजाने शेतकरी दोन पैसे मिळताय ते पदरी पडावेत म्हणून मिळेल त्या भावाने कांदा विक्री करत आहेत. त्याचमुळे रोज २५ हजार क्‍विंटलपर्यंत आवक दोन्ही आवार मिळून होत आहे. दरम्यान, सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली, तर स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव एक हजार ८०० ते दोन हजार ३७५, तर सरासरी एक हजार ९१५ रुपयांपर्यंत होते. बाजरीस स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ होऊन एक हजार ४०१ ते दोन हजार २५१, तर सरासरी एक हजार ७५० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याला सरासरी तीन हजार ३२५ रुपयांपर्यंत, तर सोयाबीनला सरासरी तीन हजार ७०० रुपयांपर्यंत भाव होते.

मका प्रथमच दोन हजारांच्या उंबरठ्यावर यापूर्वी एक हजार ५०० रुपये भाव मिळाला, तरी मकाला विक्रमी भाव वाटत होता. मात्र या वर्षी मका भावाने उच्चांक नोंदवत विक्रम केला आहे. खासगी बाजारातच एक हजार ८०० पार केल्याने शासकीय केंद्राकडे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली, तर मकास व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात मक्‍याची आवक तीन हजार ८२० क्विंटल झाली असून, बाजारभाव एक हजार ७७० ते एक हजार ९२९, तर सरासरी एक हजार ८८० रुपये क्विंटलपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com