Agriculture news in marathi Bt cotton in Jalgaon 25 lakh packets needed | Agrowon

जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची गरज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा पाच लाख ३० हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल, त्यासाठी बीटी कापूस बियाण्याची किमान २५ लाख पाकिटे आवश्यक आहेत.

जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा पाच लाख ३० हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल, त्यासाठी बीटी कापूस बियाण्याची किमान २५ लाख पाकिटे आवश्यक आहेत, तसेच सुमारे एक लाख सरळ वाणांची पाकिटे आवश्यक असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र सर्वाधिक असते. एकूण आठ लाख हेक्टरवर खरीप हंगाम असतो. ९० ते ९२ टक्के कापूस उत्पादक शेतकरी बीटी कापसाची लागवड करतात, असे गृहीत धरून बीटी कापसाच्या किमान २५ लाख पाकिटांची आवश्यकता यंदाही जिल्ह्यात असणार आहे. गेल्या हंगामात सुमारे २३ लाख पाकिटांची गरज भासली होती. त्यात काही विशिष्ट वाणांचीदेखील अधिक मागणी असते, त्याची कृत्रीम टंचाईदेखील तयार केली जाते.

हा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित कंपन्यांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. खरिपाची तयारी काही दिवसात वेगात सुरू होईल. जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघूर नदीच्या लाभक्षेत्रात मे महिन्याच कापूस लागवडीवर भर दिला जातो. पण गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्याच्या उद्देशाने गेले दोन वर्षे बियाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध केले जात आहे. यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.

रावेर, यावल, जामनेर, पाचोरा, चोपडा आदी भागात केळी पीक असते. केळी पिकासाठी चांगले बेवड म्हणून या भागात पूर्वहंगामी सरळ कापूस वाणांची लागवडही केली जाते. या भागात किमान एक लाख सरळ वाणांच्या पाकिटांची गरज असणार आहे.

पण जिल्ह्यात गेले दोन वर्षे सरळ वाणांचा पुरवठा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केला जातो. देखील पुरेसा नसतो. यामुळे काळाबाजार, परराज्यातून खरेदीचे प्रकार होतात, ही बाब लक्षात घेता सरळ वाण पुरवठादार कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा करून घेण्याचे नियोजनही कृषी यंत्रणा करीत असल्याची माहिती मिळाली.
 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...