agriculture news in Marathi, BT seed will provide after 15 may, Maharashtra | Agrowon

बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाई
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५ मेपूर्वी बीटी बियाण्यांचा कोणत्याही तालुक्यात पुरवठा करू नये, असे आदेश दिले आहेत. बियाण्यांचा पुरवठा लवकर केल्यास बोंडअळीचा धोका उद्भवतो, असा दावा कृषी विभागाचा आहे.

राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जाते. त्यातील १०-१५ टक्के लागवड ही अर्लीची असते. मान्सूनपूर्व पाऊस येईल किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस हमखास येईल, असे मानून काही भागांत शेतकरी धूळपेरणी करतात. मात्र, हे गृहीतक चुकल्यास बोंडअळीचा धोका मोठया प्रमाणात उद्भवतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५ मेपूर्वी बीटी बियाण्यांचा कोणत्याही तालुक्यात पुरवठा करू नये, असे आदेश दिले आहेत. बियाण्यांचा पुरवठा लवकर केल्यास बोंडअळीचा धोका उद्भवतो, असा दावा कृषी विभागाचा आहे.

राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जाते. त्यातील १०-१५ टक्के लागवड ही अर्लीची असते. मान्सूनपूर्व पाऊस येईल किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस हमखास येईल, असे मानून काही भागांत शेतकरी धूळपेरणी करतात. मात्र, हे गृहीतक चुकल्यास बोंडअळीचा धोका मोठया प्रमाणात उद्भवतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

 धूळपेरणी झालेल्या तसेच पावसाचा ताण बसलेल्या भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाटयाने झाल्याचे २०१७ च्या हंगामात आढळून आले होते. बोंडअळीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदा कोणत्याही भागात धूळपेरणी करू नये यासाठी आम्ही बियाण्यांचा पुरवठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या हंगामात देखील पुरवठा नियंत्रित केल्याने चांगला परिणाम दिसून आला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  गुलाबी बोंडअळीच्या विरोधात बीटी बियाण्यांमधील जनुकांची असलेली प्रतिकाराची क्षमता कमी झालेली आहे. त्यात पुन्हा पावसाचा ताण बसल्यास बोंडअळीचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी कंपन्यांकडून वितरकांना १५ मेपर्यंत प्लेसमेंट अर्थात बियाण्यांचा पुरवठा केला जाणार नाही.

बियाणे कंपन्यांनी राज्यातील वितरकांना यंदा भरपूर म्हणजेच जवळपास सव्वादोन कोटी बीटी पाकिटांचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. वितरकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रेत्यांकडे बियाणे पोचविणे अपेक्षित आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना ३० मेच्या आधी बीटी बियाण्यांचे पाकीट विकत मिळणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
बियाणे विक्री 

१ जूनपासून ः बियाणे उद्योग
बियाणे उद्योगातील कंपन्यांनी कृषी विभागाच्या या मनाई आदेशाला पाठिंबा दिला आहे. “आम्ही ३० मेच्या पूर्वी कोणत्याही भागात बियाण्यांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्येक कंपनी सोयीप्रमाणे मेअखेरपर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या गोदामाकडे आपला माल पोहोचता करेल. मात्र, हा माल १जूनपासून विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कंपन्या ठाम आहेत,’’ अशी माहिती बियाणे उद्योग सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...