agriculture news in marathi BTcotton Seed sales 1st may order cancelled by Agriculture department in Maharashtra | Agrowon

कापूस बियाणे विक्रीचा ‘१ मे’चा निर्णय मागे, सुधारित सूचना देणार : कृषी विभाग

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

राज्यात १ मे पासून कापूस बियाणे विक्रीचा निर्णय कृषी विभागाकडून मागे घेण्यात आला आहे.

नागपूर : राज्यात १ मे पासून कापूस बियाणे विक्रीचा निर्णय कृषी विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोचल्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड रोखणे शक्‍य होणार नसल्याची जाणीव झाल्यानंतरच निर्णय मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कापूस बियाणे विक्रीबाबत सुधारीत सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

राज्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचा गेल्या अनेक वर्षातील अनुभव आहे. याच कारणामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक भरपाई देखील द्यावी लागली होती. गेल्या काही वर्षांपासून राज्यात कापूस बियाणे विक्रीकरिता पॅटर्न या आनुषंगिक निश्चित करण्यात आला आहे. त्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची मदत घेण्यात आली. संस्थेच्या शिफारसीनुसारच दरवर्षी २५ मे पासून कापूस बियाणे विक्रीबाबत ठरले. १५ जूनपासून शेतकऱ्यांनी लागवड करावी, असेही शिफारशीत आहे. परंतु यावेळी लॉकडाऊनमुळे बियाणे वाहतूक प्रभावित झाल्यास बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची झुंबड उडेल, अशी भिती होती. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा यामुळे उडणार होता. परिणामी कृषी विभागाकडून शुक्रवार (ता. १) पासून बियाणे विक्रीचे ठरले होते. बियाणे विक्रीनंतर कृषी विभाग शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना १५ जूनपर्यंत लागवडीपासून परावृत्त करणार होता. परंतु ही बाब तितकीशी सोपी नसल्याने अखेर बियाणे विक्रीच्या निर्णयापासून कृषी विभागाने माघार घेतली आहे.

प्रतिक्रिया
"लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर लवकर बियाणे विक्रीसंदर्भाने कृषी विभागाकडून मार्गदर्शन मागण्यात आले होते. लवकर बियाणे विक्री केली तरी १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना लागवडीपासून परावृत्त करण्यासाठी जागृतीची गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर एक मेपासून बियाणे विक्रीबाबत ठरले होते. दरवर्षी २५ मे नंतर कापूस बियाणे विक्रीची शिफारस संस्थेने केली आहे.’’
- डॉ. विजय वाघमारे,
संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...