पुणे : अर्थसंकल्पीय सभा ग्रामीण भागात घेण्याची परवानगी द्यावी

Budget meetings should be allowed in rural areas
Budget meetings should be allowed in rural areas

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेला देखील बसण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी तातडीने बैठक बोलवून चर्चा केली. ही सभा घेणे आवश्‍यक असल्याने ती जिल्हा परिषदेऐवजी ग्रामीण भागात सभा घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २४) आयोजित करण्यात आली होती. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभा घेणे योग्य ठरणार नाही. तसेच अंदाजपत्रकीय सभा असल्याने अध्यक्ष यांनी लेखी प्रतिपादने पाठवण्याच्या पद्धतीनुसार (सरक्युलेटरी) ही सभा देखील घेता येत नाही. सभेच्या प्रचलित नियमानुसार सदरची सभा घ्यावी लागणार असून, ग्रामीण भागात घेण्यासाठी सभा परवानगी देण्यात यावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येईल. असे पत्र अध्यक्षा पानसरे यांनी विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. 

जिल्हाच्या विकासासाठी नवीन योजना, योजनांना देण्यात येणारा निधी, विभागांना त्यांच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी निधी या अंदाजपत्रकात जाहीर करण्यात येते. सभेचा अजेंडा सर्व सदस्यांना पाठवण्यात आला आहे. अंदाजपत्रकीय सभा ही मार्च महिन्याच्या अगोदर होणे आवश्यक असल्याने, ही सभा ठरलेल्या दिवशी होणे गरजेच आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बायोमेट्रिक यंत्रणा बंद करण्याची  आवश्‍यकता नाही ः आयुष प्रसाद कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समितीच्या कार्यालयातील बायोमॅट्रिक यंत्रणा बंद करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. बायोमेट्रिक यंत्रणेच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. तसेच चेहरा दाखवूनही हजेरी नोंदवता येत असल्याने ही यंत्रणा बंद करण्याची आवश्‍यकता नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. तसेच मुख्यालयात चेहरा दाखवून हजेरी नोंदणी यंत्रणा (फेस रिकग्नायझेशन) असल्याने त्या यंत्राला हात लावण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय बायोमॅट्रिक यंत्रणेच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. यामुळे या यंत्रणा बंद करता येणार नसल्याचे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com