Agriculture news in Marathi, budget of zilla Parishad, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा अर्थसंकल्प
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ आणि पुरवणी असा मिळून तब्बल १०० कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणून शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्यासाठी ५० लाख, तर महिलांना घरघंटी (पिठाची चक्‍की) देण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, अर्थ सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सभा पार पडली. 

सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ आणि पुरवणी असा मिळून तब्बल १०० कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणून शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्यासाठी ५० लाख, तर महिलांना घरघंटी (पिठाची चक्‍की) देण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, अर्थ सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सभा पार पडली. 

या वेळी राजेश पवार यांनी पुरवणी बजेट मांडले. जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे मूळ अंदाजपत्रक ४५ कोटी व आज मांडलेले ५५ कोटी असे एकूण ९९ कोटी ८८ लाखांचे बजेट सादर करण्यात आले. १२ लाखांची शिल्लकही सादर करण्यात आली. त्यातून पशुसंवर्धन विभागाला दहा लाख वाढवून देण्यात आले. या वेळी प्रथमच बॅंकांमध्ये ठेवलेल्या विविध योजनांवरील निधीच्या ठेवींचे व्याज अर्थसंकल्पात दाखवण्यात आल्याने १५ कोटींची वाढ झाल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

शिक्षण विभागासाठी नऊ कोटी २५ लाख दिले असून, शाळांच्या स्वच्छतेसाठी डस्टबिन पुरविणे, केंद्र शाळांना ओपन जिम, सौर प्लॅनेट बसविणे, डिजिटल क्‍लासरूम बनविणे आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाढवून मिळण्यासाठी बांधकाम विभागासाठी २५ कोटी ६५ लाखांची तरतूद केली आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मालकीच्या जागा विकसित करण्यासाठी नवीन योजना राबविली जाणार आहे. 

लघुपाटबंधारे विभागास सहा कोटी २५ लाख, आरोग्य विभागाला चार कोटी ६५ लाख, कृषी खात्याला पाच कोटी ८० लाख, पशुसंवर्धन विभागास चार कोटी, समाजकल्याणला पाच कोटी ९५ लाख, महिला व बालकल्याण विभागाला दोन कोटी ५३ लाख, पाणीपुरवठा विभागाला पाच कोटी २० लाख, जिल्हा परिषद मुद्रणालयाला दोन कोटी आठ लाख असे अंदाजपत्रक सादर केले गेले. त्यास सभागृहानेही मंजुरी दिली. 

वाढीव बजेट सादर केल्याने अनेक सदस्यांनी पदाधिकारी, सीईओंसह मुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मेंद्र काळोखे यांचे अभिनंदन केले.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...