पुणे ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध
कृषिपूरक
आर्थिक नुकसान टाळण्याकरिता काढा म्हशींचा विमा
आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्कम गुंतवलेली असते. विविध घटना किंवा आपत्तीमुळे एकाच वेळी अनेक म्हशींचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता म्हैसपालकाने विमा अवश्य करून घ्यावा. जेणेकरून व्यवसायात टिकून राहण्यास व व्यवसाय वाढण्यास मदत होईल. विविध कंपन्या म्हशीसाठी विमा पॉलिसी देतात. नजीकच्या नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या मदतीने म्हशीचा विमा करून घ्यावा.
आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्कम गुंतवलेली असते. विविध घटना किंवा आपत्तीमुळे एकाच वेळी अनेक म्हशींचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता म्हैसपालकाने विमा अवश्य करून घ्यावा. जेणेकरून व्यवसायात टिकून राहण्यास व व्यवसाय वाढण्यास मदत होईल. विविध कंपन्या म्हशीसाठी विमा पॉलिसी देतात. नजीकच्या नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या मदतीने म्हशीचा विमा करून घ्यावा.
म्हैसपालन करताना म्हशीला संगोपनासोबत व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी व आर्थिक तोटा टाळण्यासाठी विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम वंशावळीच्या व प्रजातीच्या म्हशींना बाजारात चांगला भाव मिळतो. यासोबतच गोठा, कडबा कुट्टी मशीन, पाण्याची सोय करून कमीत कमी दहा म्हशीच्या दुग्ध व्यवसाय करण्याकरिता चार ते पाच लाखांची आवश्यकता असते. अशा वेळेस म्हैस पालक हे स्वतःच्या पैशातून किंवा बॅंक व इतर संस्थाकडून कर्ज काढून व्यवसाय उभारणी करतात. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे, आजारामुळे तसेच आकस्मित कारणे जसे की आग लागणे, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे म्हशीचा मृत्यू झाल्यास, प्रचंड आर्थिक नुकसान होते. व तो पुन्हा सुरू करणे कठीण होते. असे नुकसान टाळण्याकरिता म्हशीचा विमा काढणे क्रमप्राप्त असून त्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते.
- म्हशींचा तीन वर्षे किंवा प्रथम विम्याच्या वयापासून बारा वर्षांपर्यंत विमा काढू शकतो.
- विमा काढताना म्हशीची किंमत ही म्हशीची प्रजाती व सध्याच्या बाजारभावानुसार किंमतीवर अवलंबून असून नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या शिफारशीनंतर ती ठरते.
- म्हशीच्या विम्याची रक्कम ही किंमतीच्या ४ टक्के इतकी असून कायमचे संपूर्ण दुर्बलता आल्यास या हक्काकरिता ती १ टक्के जास्त आहे.
- प्रथम विमा काढणाऱ्या म्हशीच्या रस्ता, रेल्वेने ८० कि.मी. प्रवासाकरिता जास्तीची किंमत लागत नसून ८० कि.मी. नंतर प्रवासासाठी १ टक्के जास्तीची रक्कम द्यावी लागते.
- ५ ते १० म्हशींचा एकत्रित विमा काढल्यास २.५ टक्के व ११-१५ म्हशींच्या विमाकरिता ५ टक्के किंमतीत बचत मिळते.
- तीन वर्षांच्या मुदतीसाठी १५ टक्के व पाच वर्षाच्या मुदतीसाठी २५ टक्के विम्याच्या मूळ रक्कमेमध्ये बचत मिळते.
खालील घटना किंवा आजारामध्ये विम्याची रक्कम मिळते
- म्हशीचा पूर, वादळ व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास.
- विविध रोग (लसीकरण उपलब्ध असल्यास पशुवैद्याकडून लस दिल्याची नोंद ठेवावी.)
- वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, अपघात इत्यादी.
- भूकंप.
- म्हशीचे इतर आजार.
- कायमची संपूर्ण दुर्बलता जसे कासदाह रोगामध्ये सड बंद होणे, म्हशी गाभण न राहणे यासाठी विमा पॉलिसीनुसार रक्कम प्राप्त होते.
खालील बाबी/घटनेमध्ये विम्याची रक्कम मिळत नाही.
- विमा सुरू झाल्यानंतर म्हशीला होणारे १५ दिवसांत रोग आजार.
- ८० किमी पेक्षा जास्त अंतरावर म्हशीची वाहतूक.
- म्हशी हरवणे किंवा चोरी होणे.
- निष्काळजीपणा, जास्त संख्या ठेवणे.
अयोग्य उपचार इत्यादी बाबीमध्ये विमा रक्कम मिळत नाही.
- युद्ध, आण्विक हल्ला इत्यादी.
- म्हशीच्या विमा केल्यानंतर कानातील बिल्ला हरविल्यास/नसल्यास विमा मिळत नाही.
- म्हैसपालकाने कानातील बिल्ला हरवल्यास पुन्हा बसवून घ्यावा.
म्हशीचा मृत्युनंतर क्लेम पद्धत
- म्हशीच्या मृत्युचे तसेच शवविच्छेदन (postmartem) अहवाल हा नोंदणीकृत पशुवैद्याकडून घ्यावा.
- कंपनीला त्वरित कळवणे (सात दिवसांपर्यंत किंवा विमा पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे)
- कानातील बिल्ला.
- मृत्युनंतरचे फोटो, मूळ मालकासोबत
- म्हशीचा विम्याची कागदपत्रे व्यवस्थितपणे जपून ठेवावी. तसेच बिल्ला हरवल्यास कंपनीमार्फत त्वरित बसवून घ्यावा.
संपकर् ः डाॅ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२
(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला)
- 1 of 22
- ››