फळझाड लागवडीतून बांध करा उत्पादनक्षम ः रामदास तडस

फळझाड लागवडीतून बांध करा उत्पादनक्षम ः रामदास तडस
फळझाड लागवडीतून बांध करा उत्पादनक्षम ः रामदास तडस

वर्धाः पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कृषी विज्ञान केंद्र सेलसूराच्या वतीने परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, मिलिंद भेंडे, वनक्षेत्रपाल एस. एम. जाधव आदी या वेळी उपस्थित होते.  वातावरणातील बदलाचे परिणाम जागतिक स्तरावर अनुभवले जात आहेत. पूर्वी पाऊस संततधार पडत होता. आता मात्र एकदा पाऊस पडल्यानंतर मोठा खंड पडतो. पिकाला पाण्याची गरज असतानाच तो पडत नाही. त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. अशा अनेक समस्या केवळ वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झाल्या आहेत. हे थांबवायचे असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे मत खासदार रामदास तडस यांनी या वेळी बोलताना व्यक्‍त केले. मिलिंद भिसे यांनी वृक्षांचे निसर्गातील महत्त्व याविषयी माहिती दिली. वन्यप्राण्यांचा त्रास वाढीस लागल्यामुळे बांधावरील वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करीत आपले बांधही उत्पन्नक्षम करण्यावर भर दिला आहे, अशा प्रकारची प्रयोगशीलता शेतकऱ्यांनी जपली तर निश्चितच उत्पन्नात वाढ होईल, असा आशावाद भिसे यांनी व्यक्‍त केला.  या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षणतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगातईकर यांनी केले. या वेळी केव्हीकेचे डॉ. धनराज चौधरी, डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. रूपेश झाडोदे, विशाल उंबरहंडे, कांचन तायडे, माधुरी डफडे, शारदा फुलोरकर, प्रविण भुजाडे, गजानन पचारे, रोशन फाले, संजय मस्कर आदी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com