Agriculture news in marathi; Build fruit from plant cultivation Productivity: Ramdas Tadas | Agrowon

फळझाड लागवडीतून बांध करा उत्पादनक्षम ः रामदास तडस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

वर्धाः पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कृषी विज्ञान केंद्र सेलसूराच्या वतीने परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, मिलिंद भेंडे, वनक्षेत्रपाल एस. एम. जाधव आदी या वेळी उपस्थित होते. 

वर्धाः पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कृषी विज्ञान केंद्र सेलसूराच्या वतीने परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, मिलिंद भेंडे, वनक्षेत्रपाल एस. एम. जाधव आदी या वेळी उपस्थित होते. 

वातावरणातील बदलाचे परिणाम जागतिक स्तरावर अनुभवले जात आहेत. पूर्वी पाऊस संततधार पडत होता. आता मात्र एकदा पाऊस पडल्यानंतर मोठा खंड पडतो. पिकाला पाण्याची गरज असतानाच तो पडत नाही. त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. अशा अनेक समस्या केवळ वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झाल्या आहेत. हे थांबवायचे असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे मत खासदार रामदास तडस यांनी या वेळी बोलताना व्यक्‍त केले.

मिलिंद भिसे यांनी वृक्षांचे निसर्गातील महत्त्व याविषयी माहिती दिली. वन्यप्राण्यांचा त्रास वाढीस लागल्यामुळे बांधावरील वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करीत आपले बांधही उत्पन्नक्षम करण्यावर भर दिला आहे, अशा प्रकारची प्रयोगशीलता शेतकऱ्यांनी जपली तर निश्चितच उत्पन्नात वाढ होईल, असा आशावाद भिसे यांनी व्यक्‍त केला.

 या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षणतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगातईकर यांनी केले. या वेळी केव्हीकेचे डॉ. धनराज चौधरी, डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. रूपेश झाडोदे, विशाल उंबरहंडे, कांचन तायडे, माधुरी डफडे, शारदा फुलोरकर, प्रविण भुजाडे, गजानन पचारे, रोशन फाले, संजय मस्कर आदी उपस्थित होते. 
 

इतर बातम्या
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...