शेतकऱ्यांच्या साह्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा उभारू ः कडू 

पुलवजा बंधारे उभारून शाश्‍वत सिंचन सुविधा उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच शेतशिवारात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ताही उपयोगी पडेल, असे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सांगितले.
To build sustainable irrigation facilities to help farmers: Bitter
To build sustainable irrigation facilities to help farmers: Bitter

अमरावती : शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नदी प्रवाहाच्या मार्गात पुलवजा बंधारे उभारून शाश्‍वत सिंचन सुविधा उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच शेतशिवारात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ताही उपयोगी पडेल, असे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सांगितले.  

चांदूर बाजार तालुक्यातील चिंचोली (ब्राह्मणवाडा) येथे राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते तीन ठिकाणच्या ३ कोटी रुपयांच्या पुलवजा बंधारा निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जलसंपदा विभाग, लघू पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अभियंता, शलाका कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाना ठाकरे या वेळी उपस्थित होते. 

श्री. कडू म्हणाले, की राज्यात सिंचनाचा अनुशेष सर्वांत जास्त विदर्भात आहे. सिंचनाअभावी विदर्भाच्या काळ्या कसदार जमिनीची अत्युच्च उत्पादकता असूनही शेतकरी प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यात कमी पडत आहे. शाश्‍वत सिंचन नसल्यामुळे वर्षात केवळ खरीप हंगामातील पिकांवरच शेतकरी अवलंबून राहतो. परंतु, रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामांत बंधाऱ्याच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता झाल्यास त्या त्या क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होईल, त्यांना आर्थिक स्थैर प्राप्त झाल्यास शेतकरी बांधव सुखावला जाणार, विदर्भातील सिंचनाचे प्रमाण वाढून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बागायतदार व्हावे, या उद्देशाने शासनाने शाश्‍वत सिंचनासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम आणला आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

चांदूरबाजार तालुक्यातील मौजा चिंचोली येथे पुलवजा बंधारा बांधण्यात येणार असून, या कामाची अंदाजित किंमत १ कोटी ५ लक्ष एवढी आहे. तसेच मौजा गौरखेडा येथे दोन ठिकाणी १ कोटीचे पुलवजा बंधारे उभारण्यात येणार आहे. हे बंधारा बांधकामाचे काम शलाका कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. या बंधाऱ्याच्या बांधकामामुळे त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शाश्‍वत सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्याच्या माध्यमातून तेथील संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com