agriculture news in Marathi building construction works will start outside the restricted area Maharashtra | Agrowon

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकामांना परवानगी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्ह्यात टाळेबंदी आहे. यामुळे सर्व बांधकामे, पायाभूत सुविधांची कामे देखील बंद आहेत.

पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्ह्यात टाळेबंदी आहे. यामुळे सर्व बांधकामे, पायाभूत सुविधांची कामे देखील बंद आहेत. परंतु आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या अर्धवट कामामुळे पूरस्थिती निर्माण होऊन एखादा धोका उद्भवू नये, यासाठी अतिबाधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी अर्धवट स्थितीतील बांधकामे पूर्ण करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सशर्त परवानगी दिली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह हवेली तालुक्यातील २७ ग्रामपंचायती हे जिल्हातील कोरोना प्रभावित क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरीत भागात बांधकामे सुरू होणार आहेत. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये मॉन्सूनपूर्व कामे, तसेच टाळेबंदी पूर्वी अर्धवट राहिलेली बांधकामे सुरू करण्यास अटीसह परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जोत्याचे बांधकाम, संरक्षण भिंतींचे बांधकाम, बेसमेंटचे बांधकाम, अपूर्ण अवस्थेतील प्लास्टर व प्लंबिंगची कामे करता येणार आहे. 

ही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. यात कामगारांची निवास आणि भोजनाची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करणे, दररोज प्रत्येक कामगाराचे थर्मल स्कॅनिंग करणे, आठवड्यातून दोन वेळा सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, कामगारांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळणे, कामाच्या ठिकाणी सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी परवानगी घेतलेल्या, अकृषक परवाना असलेल्या व अर्धवट स्थितीतील कामांनाच परवानगी देण्यात येणार आहे. 

यासाठी संबंधित जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, कँटोन्मेंट बोर्ड यांनी अतिबाधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रांमध्ये प्रकरणनिहाय परवानगी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राम यांनी दिले आहेत. पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित केला असून, या भागात कोणत्याही अर्धवट बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...