भारत-कुवेतदरम्यान बांधला  जातोय कृषी निर्यातीचा पूल

भारत-कुवेत दरम्यान कृषी निर्यात वाढविण्यासाठी दोन्ही देशांकडून उत्तम प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सक्रिय सहभाग घेतला आहे.
Built between India and Kuwait A bridge for agricultural exports
Built between India and Kuwait A bridge for agricultural exports

पुणे ः भारत-कुवेत दरम्यान कृषी निर्यात वाढविण्यासाठी दोन्ही देशांकडून उत्तम प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सक्रिय सहभाग घेतला आहे.  एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने व चेंबरच्या कृषी व कृषिउद्योग समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी यांच्या प्रयत्नातून कुवेतमधील भारतीय दुतावासातील माध्यमातून अलिकडेच दूरदृश्‍यप्रणालीद्वारे एक चर्चासत्र घेण्यात आले. कुवेतसाठी निर्यात वाढविण्यास इच्छुक असलेल्या निर्यातदार व आयातदारांमध्ये झालेल्या बैठकीलाही चांगला प्रतिसाद मिळाला.  शेतीमाल निर्यातीसाठी देशात महाराष्ट्राची भूमिका मोलाची आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासातील भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी स्मिता पाटील यांनी पुढाकार घेत ही चर्चा घडवून आणली. राज्यातील शेतीमाल निर्यातदार, कुवेतमधील शेतकरी व आयातदार या उपक्रमात मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते. निर्यातदार व आयातदारांमधील थेट संवाद राज्याच्या निर्यात वाढीसाठी निर्णायक ठरेल. त्यामुळेच चेंबरने, असे उपक्रम वाढविण्यासाठी शेतीमाल निर्यात सुविधा केंद्राचा उत्तमरीत्या वापर करून घेण्याचे ठरविले आहे.  राजदूत सीबी जॉर्ज यांनीही या उपक्रमाला हजेरी लावली. ‘‘भारतीय कृषी क्षेत्राची क्षमता बघता आम्ही येथील निर्यातदारांना आणि कुवेतमधील आयातदारांना जवळ आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यातून कुवेतकडे निर्यात वाढू शकते,’’ असे ते म्हणाले. या वेळी गिरबाने, सरंगी तसेच  इकरम हुसैन, अजहर पठाण, अजहर तंबुवाला, केतन माने यांनी आपली मते मांडली. कुवेतला फळे, भाजीपाला व अन्नधान्याची निर्यात करणारा भारत हा सध्या एक अग्रगण्य देश बनला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग म्हणून दोन्ही देशांमधील शेतमालाचा व्यापार वाढविण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com