बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित

जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता. २०) झालेल्या अतिवृष्टी तसेच नदी नाल्यांच्या पुरामुळे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. २२१ गावांत ९२१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर ८०० हेक्टर शेतीचे सिंदखेडराजात नुकसान झाले आहे. शिवाय पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Buldana affected an area of ​​ten thousand hectares
Buldana affected an area of ​​ten thousand hectares

बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता. २०) झालेल्या अतिवृष्टी तसेच नदी नाल्यांच्या पुरामुळे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. २२१ गावांत ९२१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर ८०० हेक्टर शेतीचे सिंदखेडराजात नुकसान झाले आहे. शिवाय पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात दोन दिवस काही तालुक्यांत जोराचा संततधार पाऊस झाला. या पावसासोबतच वादळी वारेसुद्धा वाहिले. शिवाय यामुळे नदी-नाल्यांना पूरही आले. परिणामी प्रामुख्याने सिंदखेडराजा, मोताळा, देऊळगावराजा, शेगाव, बुलडाणा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले.

जिल्ह्यात सध्या सोयाबीनचे पीक काढणीला आहे. तर मका परिपक्व होत आहे. कपाशीच्या शेतांमध्ये बोंड्या लागत आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये दहा दिवस संततधार पाऊस झाल्याने मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता या दोन दिवसांतील पावसामुळे नुकसान झाले आहे. शनिवार व रविवारी प्रामुख्याने सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

यात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, पपई तसेच भाजीपाल्याचे २६०० हेक्टरवर नुकसान झाले. शिवाय याच तालुक्यात आठशे हेक्टर शेतजमिनीचेही नुकसान झाले. असे एकूण ३४०० हेक्टरचे सर्वाधिक नुकसानीचा याच तालुक्याचा प्राथमिक अंदाज आहे.  लगतच्या देऊळगावराजा तालुक्यातही मोठे नुकसान झाले. येथे १७९५ हेक्टरवरील पिके बाधीत झाली. मोताळा तालुक्यात २९ गावात २५७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका,

ज्वारी, सोयाबीनचे नुकसान झाल्याचे तेथील यंत्रणेने कळविले आहे. नांदुरा तालुक्यात ४००, खामगावमध्ये ३५७, बुलडाणा तालुक्यात २२५ हेक्टर व इतर तालुक्यातही थोडेफार नुकसान झाले. पिक व जमिनीचे नुकसान मिळून एकूण १० हजार १५ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाने शासनाकडे सादर केला आहे.

पाच जण बुडाले रविवारच्या पावसानंतर जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आले. या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. यात खामगाव तालुक्यातील तिघे बोर्डी नदीत, नांदुरा तालुक्यातील एक तरुण ज्ञानगंगा नदीत तर मेहकर तालुक्यातील एक तरुण कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचवतांना दुर्दैवाने मृत्युमुखी पडला. विजय सुरुशे असे या तरुणाचे नाव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com