बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गेल्या वर्षापेक्षा यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
In Buldana district, 2.5 lakh farmers took out crop insurance
In Buldana district, 2.5 lakh farmers took out crop insurance

बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गेल्या वर्षापेक्षा यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन लाख ३१९८ हेक्टरवरील पिकांना या विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. जिल्ह्यात पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे आहे.

गेल्या हंगामात पीक काढणीच्या काळात अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांनी पीकविम्याचा मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल पीक काढणीकडे वाढल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी २ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यात यंदा जवळपास २८ हजारांवर शेतकऱ्यांची भर पडली.

३१ जुलैला पीक विमा उतरविण्याची मुदत संपलेली आहे. या तारखेपर्यंत दोन लाख ६६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. यात सर्वाधिक सिंदखेडराजा तालुक्यातील ३९६८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यात १२५३६, चिखली १९५०१, देऊळगावराजा २५५१५, जळगाव जामोद २४६३१, खामगाव ३३०४६, लोणार १३२४७, मलकापूर २४९३८, मोताळा ३८०७, नांदुरा १२६४९, संग्रामपूर ३०३५१ आणि शेगाव तालुक्यातील २११५७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मोताळा तालुक्याने फिरवली पाठ गेल्या वर्षाच्या तुलनेत पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यात २८ हजार शेतकऱ्यांचा वाढीव सहभाग दिसत असला तरी याच जिल्ह्यात मोताळा तालुक्यात सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ३६ हजार शेतकरी असलेल्या या तालुक्यात केवळ ३८०७ शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा काढण्यासाठी सहभाग घेतला. गेल्यावर्षात या तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली. या तालुक्यात कपाशी, मका, सोयाबीन, तूर अशी पिके खरिपात घेतली जातात. शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी सरासरी उत्पन्नाचा निकष वापरला जातो. याचाच फटका गेल्या वर्षात मोताळ्यातील शेतकऱ्यांना बसला आणि त्यामुळे यंदा कृषी विभागाने जनजागृती करूनही शेतकरी विमा काढण्यासाठी सुविधा केंद्र, बँकेत गेलाच नाही. या तालुक्याचा सर्वात कमी प्रतिसाद राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com