Agriculture news in marathi; Buldana district again rains on the Ghats | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात घाटावर पावसाचा पुन्हा तडाखा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

बुलडाणा  ः जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यांमध्ये रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला असून बुलडाणा तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीटही झाली. सोयाबीन ऐन काढणीचे दिवस सुरू झालेले असताना अशाप्रकारचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

बुलडाणा  ः जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यांमध्ये रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला असून बुलडाणा तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीटही झाली. सोयाबीन ऐन काढणीचे दिवस सुरू झालेले असताना अशाप्रकारचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

रविवारी दुपारनंतर बुलडाणा, चिखली, मेहकर या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यात नांद्राकोळी, रुईखेड, सव, खुपगाव, अजिसपूर या परिसरात जोरात पाऊस झाला. यादरम्यान काही मिनिटे गारांसह पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने यंत्रणांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यावर यावर्षी पावसाची चांगली कृपा झालेली आहे. गेल्यावर्षी दुष्काळी झळा झेलणाऱ्या या भागात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सध्या या भागात सोयाबीन सोंगणीचे सार्वत्रिक काम सुरू आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या सुड्या रचण्याचे काम सुरू होते. तर काही ठिकाणी सोयाबीनची सोंगणी केली जात होती. गेल्या आठ-दहा दिवसांत पावसाने उसंत दिल्याने सोयाबीन काढणीचे काम वेगाने सुरू झाले होते. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची सोयाबीन गोळा करण्यासाठी एकच पळापळ झाली.

सोयाबीन ओली झाल्याने मळणीचे काम लांबेल. रविवारी झालेल्या पावसाने सोंगून ठेवलेल्या तसेच सोंगणी व्हायची असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे. गारपीट झालेल्या भागात सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या. कपाशीची पाने, बोंड्या जमिनीवर आल्या. या भागात रब्बी मक्याची लागवड सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी मका अंकुरला असून गारींचा या पिकालाही तडाखा बसला. या भागात भाजीपाल्याची पिके मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. या पिकांनाही गारपिटीमुळे नुकसान झेलावे लागले.

पाऊस आता पुरेसा
सलग पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे आता नुकसान सुरू झाले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे दुष्काळाला सामोरे गेलेल्या या जिल्ह्यात आता सलग पावसामुळे ओल्या दुष्काळाची चिन्हे तयार होऊ लागली आहेत. सतत पाऊस होत असल्याने शेतीतील कामे रखडणे, काढणीला आलेले पीक ओले होत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. कापसाची वेचणीही सुरू होत आहे. हा कापूसही ओला होत आहे. रब्बी हंगाम लवकरच सुरू होत आहे. यासाठी आता पावसाने ब्रेक घेणे खूप गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहे. 

इतर बातम्या
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...