Agriculture news in Marathi In Buldana district, farm grants are stagnant | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान रखडले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे शेततळे खोदण्याअगोदर पूर्व संमती या शेतकऱ्यांना देण्यात आली होती. तरीही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे शेततळे खोदण्याअगोदर पूर्व संमती या शेतकऱ्यांना देण्यात आली होती. तरीही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशाने हे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविले जाते. यात नवीन फळबागांची लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुजीवन, सामूहिक शेततळे खोदून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेडनेट हाउसमध्ये नियंत्रित शेती, सेंद्रिय शेती असे विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१४-१५ पासून केंद्र शासनाचे हे उपक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राबविले जात आहेत.

या अंतर्गत जिल्ह्यात मेहकर तालुक्यात जानेफळ परिसरातील घुटी व इतर गावात शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळे खोदले. ३४ बाय ३४ आकाराच्या शेततळ्यासाठी पाच लाखांवर खर्च केलेला आहे. हे शेततळे खोदण्यासाठी शासनाकडून पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात या शेततळ्यांचे खोदकाम, प्लॅस्टिक अस्तरीकरण पूर्ण केले. यासाठी शेतकऱ्यांचा पाच लाख रुपयांवर खर्च झालेला असून काही जणांनी हातउसनवारी करून पैसे जमवीत ही कामे पूर्ण केली.

आता या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शासनाने सर्वच शासकीय योजनांना कात्री लावलेली आहे. मे महिन्यापासून तर योजनांच्या कामांना पूर्वसंमतीही देणे थांबविण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी ज्या कामांना पूर्वसंमती दिलेली आहे त्यांचे अनुदान तातडीने दिले जावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मी ३४ बाय ३४ आकाराचे शेततळे खोदून आता तीन महिने लोटले आहेत. याचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. शासनाने सध्याच्या अडचणीच्या काळात हे अनुदान जमा करावे, अशी आमची मागणी आहे.
- महादेव पाटील, घुटी, ता. मेहकर जि. बुलडाणा

एकात्मिक फलोद्यानअंतर्गत खोदलेल्या शेततळ्यांची मोका तपासणी केली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असून अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
- सत्येंद्र चिंतलवाड, तालुका कृषी अधिकारी मेहकर, जि. बुलडाणा


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...